Weight Loss In Summer: धावपळीचे जीवन आणि अवेळी खाणे यामुळे अनेकांनचे वजन वाढले आहे. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात.
व्यायाम आणि आहार नियंत्रणानंतरही लोकांचे वजन कमी होत नाही. उन्हाळा सुरू झाला असून या काळात तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर काही उपाय सांगणार आहोत.
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक्सचे सेवन करावे हे जाणुन घेउया.
हे ड्रिंक कसे बनवायचे
एक कप कोमट पाणी घ्यावे.
नंतर त्यात सब्जा बिया मिस्क करावे.
अर्ध्या चमचा लिंबाचा रस पिळावे.
एक चमचा मध घाला आणि नंतर चांगले मिक्स करा.
वेट लॉस ड्रिंक तयार आहे.
सब्जा
अल्फा-लिनोलेनिक अॅसिडमध्ये समृद्ध सब्जाच्या बिया शरीरात फॅट बर्न करणारे चयापचय वाढवण्यास मदत करते. सब्जाच्या बियांमध्ये असलेले फायबर शरीरातील चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून वजन कमी करण्यास मदत करतात.
लिंबू
लिंबुचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच पचनसंस्था सुलभ राहते. चवीला आंबट आणि प्रभावाने गरम असते. लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते आणि जळजळ कमी करते. फॅट बर्निंग गुणधर्मांसोबतच त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट, थायामिन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
मध
हे एक उत्तम फॅट बर्नर आहे. हे चवीला गोड असुन खायची क्रेविंग दूर ठेवते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून वजन सहजतेने कमी करण्यास मदत करते.
हे ड्रिंक कधी प्यावे
उन्हाळ्यात (Summer) या पेयाचे सेवन करावे. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो. तसेच तुम्ही जेवणाच्या एक तास आधी ते पिऊ शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.