Goan Street Food: गोवा हे केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोवा म्हटले की डोळ्यासमोर फक्त बीच आणि फिश दिसते.
तसेच गोवन पदार्थांची चव चाखायला मिळते. येथील पदार्थ आणि नयनरम्य निसर्ग तुम्हाला पुन्हा गोव्यात येण्यास भाग पाडतील. गोव्यात (Goa Trip) फिरायला आल्यावर तुम्ही लज्जतदार असा स्ट्रीट फुडची चव चाखायला विसरु नका. चला तर मग जाणुन घेउया असे कोणते पदार्थ आहेत.
Gadbad Ice-Cream
गडबड आइस्क्रीम हे गोव्यातील सर्वात आवडते स्ट्रीट फूड (Street Food) आहे. हे आइस्क्रीम पाहुनच तुम्हाला खायची इच्छा होइल.यामध्ये दोन किंवा तीन वेगवेगळे आइस्क्रीम फ्लेवर्सचे मिक्चर असते. हे एका उंच ग्लासमध्ये ड्रायफ्रुटस्, शेवया, जेली किंवा जामसह सर्व्ह केले जाते. तुम्ही गोव्यात जर उन्हाळ्यात गेला असाल तर या आइस्क्रीमचा नक्की आस्वाद घ्या.
कटलेट पाव
गोव्यात तब्ब्ल 120 कटलेटचे प्रकार खायला मिळतात. बीफ कटलेटसाठी प्रसिद्ध अशा स्टॉलवर खवय्ये गर्दी करतात. बीफच्या मोठ्या तुकड्याला आधी आलं -लसूण पेस्ट आणि व्हिनेगर लावून मॅरीनेट करून मग रव्यामधून घोळून तेलात डीप फ्राय केला जातो.
लोकल कडक पावत कांदा,गाजर, मियॉनीज आणि बीफचा तळलेला कुरकुरीत तुकडा घालून दिले जाते. बीफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉप सारखे वेगळे पदार्थ इथे मिळतात. ‘फिशिटेरिन’ खवय्यांसाठी खास चविष्ट फिश कटलेट देखील इथे मिळतात. समुद्र किनाऱ्यावर भटकंती झाल्यावर भूक लागली की अनेकांचे पाय आपोआप डिसील्वाची कटलेट खायला वळतात.
रॉस ऑम्लेट
'Ros' या शब्दाचा अर्थ कोकणी भाषेत ग्रेव्ही असा होतो. रॉस ऑम्लेट पाव चिकन करी आणि पाव मध्ये ऑम्लेट बरोबर दिला जातो. गोवन कॅथलिक शैलीत अनेक वर्षांपासून या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जात आहेत.गोव्यात गेल्यावर या ऑम्लेटची चव चाखायला विसरु नका.
गोव्यातील आणखी एक स्थानिक स्ट्रीट फूड म्हणजे म्हणजे फिश थाली. ही थाळी कोकणातील अनेक घरांमध्ये एक प्रमुख पदार्थ आहे. या थालीमध्ये भात, चपात्या, फिश करी, भाजी , तळलेले मासे आणि लोणचे असतात. या थालीची चव तुम्हाला नक्की आवडेल.
Chicken Shawrma
चिकन शावरमा हा पदार्थ गोव्यातील एक लोकप्रिय डिश आहे. हा एक फ्रँकीज प्रकार आहे. गोव्यात फिरायला गेल्यावर हा पदार्थ नक्की खाउन पाहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.