Breast Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer: 'या' 5 गोष्टी जास्त शिजवू नका! वाढू शकतो कर्करोगाचा धोका

Foods That Increase Cancer Risk: आजकालची बदलती जीवनशैली, सध्या वाढत असलेला कामाचा ताण, जंकफूडचे सेवन अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय.

Manish Jadhav

आजकालची बदलती जीवनशैली, सध्या वाढत असलेला कामाचा ताण, जंकफूडचे सेवन अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यात लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोगसारखे आजार होऊ लागले आहेत. खासकरुन, गेल्या काही वर्षात कर्करोग जगभरात वेगाने पसरला आहे. कर्करोगाची अनेक कारणे आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपला आहार. आज आपण या बातमीच्या माध्यमातून अशा 5 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जास्त शिजवल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

1) बटाटे आणि इतर स्टार्चयुक्त पदार्थ

बटाटे, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि इतर स्टार्चयुक्त पदार्थ उच्च तापमानावर शिजवल्याने किंवा तळल्याने अ‍ॅक्रिलामाइड नावाचे हानिकारक रसायन तयार होते. या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो. 120 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात पिष्टमय पदार्थ शिजवले की, हे रसायन तयार होऊ लागते. म्हणून, बटाटे किंवा इतर पिष्टमय पदार्थ कमी प्रमाणात शिजवावेत.

2) मांस आणि मासे

उच्च तापमानावर मांस आणि मासे शिजवल्याने किंवा ग्रिल केल्याने हेटेरोसायक्लिक अमाइन (HCAs) आणि पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) नावाची हानिकारक रसायने तयार होतात. ही रसायने डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात आणि कर्करोगास कारणीभूत ठरु शकतात. याव्यतिरिक्त, मांस मॅरीनेट केल्याने या रसायनांची निर्मिती कमी होते.

3) तेल आणि फॅट

तेल अधिकाधिक गरम केल्याने अ‍ॅक्रोलिन आणि इतर हानिकारक एंजाइम तयार होते जे शरीरात प्रवेश करतात आणि ऑक्सिडेटिव्ह निर्माण करतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. म्हणून, एकदा वापरल्यानंतर तेल पुन्हा वापरु नका आणि ते जास्त गरम करणे टाळा. ऑलिव्ह ऑइल वापरणे आरोग्यासाठी चांगले.

4) ब्रेड आणि बेकरी उत्पादने

ब्रेड, टोस्ट आणि इतर बेकरी उत्पादने जास्त शिजवल्याने अ‍ॅक्रिलामाइड तयार होऊ शकते. याशिवाय, बेकरी उत्पादनांमध्ये वापरली जाणारी साखर जास्त गरम केल्याने हानिकारक एंजाइम देखील तयार होऊ शकते.

5) साखर आणि साखरयुक्त पदार्थ

साखर उच्च तापमानावर गरम केल्याने अॅडव्हान्स्ड ग्लायकेशन एंड प्रॉडक्ट्स (AGEs) तयार होतात. हे एन्झाईम्स शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवतात, ज्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका वाढू शकतो. म्हणून, साखरयुक्त अन्न जास्त शिजवणे टाळावे. गोड पदार्थ आणि मिष्टान्न कमी आचेवर शिजवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

SCROLL FOR NEXT