Flipkart Diwali Sale 2022
Flipkart Diwali Sale 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Flipkart च्या दिवाळी सेलमध्ये ऑफर्सची लयलूट, दमदार स्मार्टफोन मिळताहेत 10 हजाराहूंन कमी किंमतीत

गोमन्तक डिजिटल टीम

फ्लिपकार्टवर बिग दिवाळी सेल सुरू झाला आहे. हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अशा अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवरून, तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफर्सवाले स्मार्टफोन खरेदी करू शकता. स्वस्त किंमतीत जबरदस्त फिचर्सवाला स्मार्टफोन घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर, फ्लिपकार्टवर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

एवढेच नव्हे तर, खरेदीसाठी तुम्ही SBI कार्डचा वापर केल्यास त्यावर 10 टक्के सूट मिळेल.

Poco C31

Poco C31 फोनची किंमत 10,999 रुपये आहे. सेलमध्ये, तुम्हाला हा फोन 7,499 रूपयांत मिळू शकतो. याशिवाय फ्लिपकार्ट यावर एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला या फोनवर 6,950 रूपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.53 इंच HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच, फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, तर सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy F13

Samsung Galaxy F13 फोनची किंमत 14,999 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये, तुम्ही सर्व ऑफर्ससह हा फोन रु.8,499 मध्ये खरेदी करू शकता. याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज आहे. या फोनला 6.6-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 10

Redmi 10 ची किंमत 14,999 रुपये आहे. सेलमध्ये उपलब्ध ऑफरसह, तुम्हाला हा फोन 7,999 रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. त्याच वेळी, एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर 8,400 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Redmi 10 मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT