WHO चा गंभीर इशारा! 2030 पर्यंत रक्तदाब, नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे 50 कोटी रूग्ण असतील

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुकताच शारीरिक हालचाली यावर अहवाल जाहीर केला आहे.
WHO Report
WHO Report Dainik Gomantak

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुकताच शारीरिक हालचाली यावर अहवाल जाहीर केला आहे. आरोग्य संघटनेने शारीरिक हालचालीची शक्यता अधोरेखित करत महत्वाचा इशारा देखील दिला आहे. 2030 पर्यंत रक्तदाब, नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रूग्ण 50 कोटी असतील असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शारीरिक हालचालीवर आधारित या अहवालात म्हटले आहे.

WHO Report
Goa Drug Case: अमली पदार्थ प्रकरणी आरोपी निखिल वारखंडकर याला पाच वर्षे सश्रम कारावास

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, बैठ्या जीवनशैलीमुळे गैर-संसर्गजन्य रोगाच्या (NCD) प्रकरणांत वाढ होऊ शकते. 2020 ते 2030 या कालावधीत जागतिक स्तरावर NCD 50 कोटी नवीन प्रकरणे समोर येतील असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यात 47 टक्के उच्च रक्तदाब आणि 43 टक्के नैराश्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांचे रूग्ण असतील. असेही या अहवालात म्हटले आहे.

प्रत्येक चार प्रौढांपैकी एक किंवा अधिक तसेच, 80 टक्के किशोरवयीन मुले शारीरिक हालचाली करत नाहीत. यासोबतच मुलींमध्ये शारीरिक निष्क्रियतेचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. शारीरिक हालचाल न केल्यामुळे आपण अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो.

WHO Report
सुशेगाद पात्रांव: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...!

धूम्रपान, मद्याचे सेवन कमी करणे तसेच, दैनंदिन जीवनात अधिक तास शारीरिक हालचाली केल्यास अनेक रोग टाळता येऊ शकतात. असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. शारीरिक हालचाली मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात, यामुळे नैराश्य, चिंता यापासून आपला बचाव करता येतो तसेच, मुलांच्या मेंदूचा चांगला विकास होतो. असे WHO ने म्हटले आहे.

जे लोक नियमित शारीरिक हालचाली करतात त्यांना अकाली मृत्यू, हृदयविकार, नैराश्य, स्मृतिभ्रंश 7-8 टक्के आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका 20-30 टक्के कमी असतो. याशिवाय, ते हाडे आणि स्नायू देखील मजबूत होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com