Tulsi Vivah 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tulsi Vivah 2023: तुळशी विवाहाला अवश्य करा 'हे' उपाय, वैवाहिक जीवनात मिळेल सुख

तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी तुळशीमाता आणि शाळीग्राम यांचा विवाह लावला जातो.

Puja Bonkile

Tulsi Vivah 2023: तुलशी विवाह हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी माता तुळशी आणि शाळीग्राम यांचे लग्न लावले जाते. असे मानले जाते की या दिवशी वैवाहिक जीवन आनंदाने भरण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. 

सुखी वैवाहिक जीवनासाठी टिप्स 

  • तुळशीचे विवाह लावतांना पती-पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे आणि नवीन जोडप्यासारखे कपडे घालून तुळशीमातेची पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन मधुर होईल आणि वैवाहिक जीवनातून नकारात्मकता नष्ट होईल. 

  • तुळशीची पाने स्वच्छ पाण्यात भिजवून मंदिरासमोर ठेवावे. नंतर तुळशीची पाने काढून तुमच्या लग्नाच्या चिन्हासह मंदिरात ठेवा आणि ते पाणी तुमच्या बेडरूममध्ये शिंपडा. 

  • तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना जोडप्याने एकमेकांना कलव बांधावा आणि पूजेनंतर एकत्र दान करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आर्थिक संकट कधीच घर करत नाही. 

  • जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा काही कारणाने लग्नात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीमातेला पिवळ्या धाग्याने हळदीची गाठ बांधावी. यामुळे विवाहातील अडथळे दूर होतील. 

  • तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहित व्यक्तीप्रमाणे तुळशीच्या रोपाला सजवावे. माता तुळशीला लाल वस्त्र परिधान करा आणि श्रृंगाराच्या सोळा वस्तू अर्पण कराव्या. असे केल्याने तुमच्या जोडीदारासोबत प्रेम वाढेल आणि नातं अधिक घट्ट होईल.

  • तुळशी विवाहाच्या दिवशी पती-पत्नीने माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला भोग अर्पण करावा आणि नंतर तोच भोग एकाच थाळीत एकत्र खावा किंवा एकमेकांना खाऊ घालावा, अशी समजूत आहे. 

  • तुलसी विवाहाच्या दिवशी जोडप्याने तुलसी चालिसाचा पाठ करावा. यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव तर दूर होतोच पण वैवाहिक जीवनातील त्रासही दूर होतात. वैवाहिक जीवन समृद्ध बनते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

SCROLL FOR NEXT