Nail Care Tips: नखं पिवळी पडणे किंवा त्यात भेगा दिसणे अजिबात चांगले दिसत नाही. कारण नखं हात आणि पायाचे सौंदर्य वाढवतात. पण, काही लोकांची नखे खूप कमकुवत होतात आणि वाढतात तशी तुटतात हे अनेक आजारांचे लक्षण असू शकते. पण नखं जर पिवळे किंवा कोरडे पडले असतील तर तुम्ही पुढील टिप्सचा वापर करू शकता.
या टिप्स वापरल्यास नखे चमकतील
यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडासा बेकिंग सोडा टाकावा. नंतर नखं 20 ते 25 मिनिटं पाण्यात बुडवून ठेवावे. त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी तुमचे हात पाण्यातून काढून कापसाच्या गोळ्यांनी स्वच्छ करावे. यामुळे तुमच्या नखांवर चमक येईल.
शॅम्पूचा वापर
नखांची काळजी घेण्यासाठी तुम्ही शॅम्पूच्या पाण्यात बोटं बुडवून ठेऊ शकता. यामुळे नखं स्वच्छ होतात आणि चमकदार देखील दिसतात.
नखांचा पिवळेपणा कसा कमी करावा
अनेक वेळा किचनमध्ये काम केल्यामुळे अनेक वेळा नखे पिवळी दिसू लागतात. अशावेळी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात 1 ते 2 लिंबू पिळून त्यात हात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवावे. यानंतर, आपले हात बाहेर काढावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे. नंतर नखांना थोडे क्रीम लावावे. यामुळे हातांचा पिवळेपणा कमी होईल.
नखांचा कोरडेपणा
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नखे कोरडी दिसू लागतात. याशिवाय त्यावर नियमितपणे तेल किंवा क्रिम लावावे, बदामचे तेल लावल्यास त्याचा अदिक फायदा होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.