Astro Tips For Money Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Money: चांगली कमाई करूनही खिसा रिकामाच? मग फॉलो करा 'या' टिप्स

भरपुर कमाई करुन देखील काही लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. पण ज्योतिषशास्त्रानुसार या टिप्स फॉलो केल्यास आर्थिक समस्या दुर होतात.

Puja Bonkile

Astro Tips For Money: पैसा हा कष्टाने कमावला जातो. काही लोक भरपूर पैसेही कमावतात. पण तरीसुद्धा त्यांचा खिशा रिकामाच असतो. त्या लोकांना सारखी आर्थिक चिंता असते.

त्यांना आर्थिक परिस्थितीशी सतत झगडावे लागते. स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या या पांढऱ्या वस्तूचा वापर करून तुम्ही पैशाशी संबंधित तुमच्या मोठ्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. ज्योतिष शास्त्रात सांगितलेला हा उपाय केल्याने तुमचे उत्पन्न वाढण्यासोबतच घरात येणारा पैसाही टिकुन राहिल.

ज्योतिषशास्त्रात गव्हाच्या पिठाचा एक उपाय सांगितला आहे. गव्हाच्या पिठाने फक्त चार उपाय केल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा राहील. उत्पन्न वाढीबरोबरच बचतीमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. 

  • आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा हा एक सोपा मार्ग

ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही भरपूर कमाई करत असाल पण यानंतरही पैसे टिकून राहत नसेल तर हा उपाय नक्की करुन पाहा. यासाठी गव्हाचे पीठ दळण्यापूर्वी त्यात 100 ग्रॅम हरभरा, 100 ग्रॅम तुळस आणि केशर टाकावे. 

या सर्व गोष्टी एकत्र करून शनिवारी पीठ दळून घ्यावे. आता घरातील (Home) सर्व सदस्यांनी या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाव्यात. असे केल्याने घरातील पैशाची चणचण जाणवनार नाही. आर्थिक संकट दूर होईल. यासोबतच उत्पन्नातही वाढ होईल. 

  • कर्जमुक्ती मिळेल 

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल ,पैसा मिळवण्याचे मार्ग बंद होत असतील तर ज्योतिष शास्त्राचा हा उपाय करू शकता. त्यात पिठाची भाकरी करून त्यावर मोहरीचे तेल लावावे. यानंतर शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी. यामुळे तुमची मोठ्या कर्जातूनही सुटका मिळेल. 

  • हा उपाय केल्याने पैसा टिकेल

पैसे येऊनही थांबत नसेल तर गव्हाच्या पिठात थोडी हळद मिक्स करावी. आता हे पीठ गुरुवारी गायीला खाऊ घालावे. हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती दूर होते. पैसे घरात राहू लागतील. यासोबतच मुंग्यांनाही पीठ खाऊ घालावे. त्याचा फायदा अधिक होतो.

  • सर्व समस्या दूर होतील

जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर दर शनिवारी सकाळी पीपळाच्या झाडाखाली पीठ किंवा मातीचा तुप घालून दिवा लावावा. त्याचबरोबर शनिदेवाचे नाव आणि तुमची इच्छा मनात ठेवून त्याचे दहन करा. काही दिवस असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.  

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT