Eco Friendly Traveling Tips: इको फ्रेंडली ट्रॅव्हलचा आनंद लुटण्यासाठी फॉलो करा 'या' 5 खास टिप्स

प्रवास करतांना पर्यावरणाची काळजी घेणे गरजेचे आहे.
Eco Friendly Traveling Tips:
Eco Friendly Traveling Tips:Dainik Gomantak
Published on
Updated on

Eco Friendly Traveling Tips: अनेक लोकांना प्रवास करायला आवडतो. पण प्रवास करतांना पर्यावरणाची काळजी घेणे देखील गरजेचे असते. दुस-या शहरात, गावात किंवा हिल स्टेशनला जाताना आठवणी जपणं चांगली गोष्ट आहे, पण त्यासोबत वातावरण दूषित करणंही चुकीचं आहे. प्रवासी इतर ठिकाणी जाऊन नद्या,बीच प्रदूषित करण्यासारख्या अनेक चुकीच्या पद्धतींचा अवलंब करतात. जागतिक तापमानवाढीची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.

तुम्हीही प्रवास करताना पर्यावरण प्रदूषित किंवा हानी न पोहोचवता प्रवास करु शकता. फक्त प्रवास करतांना पुढे दिलेल्या टिप्स फॉलो करा.

  • पब्लिक ट्रांसपोर्ट

तुम्ही कुठेतरी प्रवासाला जाणार असाल तर तेथे स्वतःचे वाहन न नेता पब्लिक ट्रांसपोर्टचा वापर करावा. स्वत:च्या कार किंवा बसमुळे प्रदूषण वाढते. याशिवाय डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर कार बुक करण्याऐवजी शक्य असल्यास सायकल वापरा, चालत जा किंवा कॅब शेअर करा.

Eco Friendly Traveling Tips:
Egg And Bread Morning Breakfast: तुम्हीही ब्रेकफास्टमध्ये अंडी अन् ब्रेड खाता? जाणून घ्या याचे फायदे-तोटे
  • रीसाइक्लिंग

प्रवासा दरम्यान असा गोष्टी जवळ ठेवाव्या ज्या रीसाइक्लिंग करणे शक्य आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद किंवा इतर गोष्टी वेगळ्या ठेवा आणि फेकताना त्या रिसायकल बिनमध्ये म्हणजेच डस्टबिनमध्येच टाका. प्लॅस्टिक सारख्या वस्तू रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी फेकल्याने जमीन आणि प्राणी दोघांचेही नुकसान होते.

  • पाण्याची बचत करावी

प्रवासा दरम्यान पर्यावरण रक्षणासाठी मदत करायची असेल तर जास्तीत जास्त पाणी वाचवण्याचा प्रयत्न करावा. प्रवासादरम्यान तुम्ही ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहात तेथे आंघोळ करताना जास्त पाणी वाया घालवू नका. 

लोकांसाठी उपलब्ध असलेला नळ वापरण्याचा प्रयत्न करा. परंतु पाणी वापरण्यास योग्य आहे की नाही ते पहावे. रेस्टॉरंटमध्ये जेवताना, गरज असेल तेव्हाच पाणी मागवा. नद्या किंवा बीच असलेल्या ठिकाणी फिरायला गेल्यास प्रदूषित करु नका.

Eco Friendly Traveling Tips:
Social Phobia Symptom Treatment: तुम्हालाही गर्दी,कार्यक्रमात जायला लाज वाटते? असू शकतो 'हा' आजार
  • स्थानिक गोष्टींचा वापर करावा

भारतात असे काही क्षेत्र आहेत जिथे हाताने बनवलेल्या वस्तू वापरल्या जातात. प्रवासादरम्यान तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी करू शकता. असे केल्याने तुम्ही स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत करू शकता. हाताने बनवलेले पदार्थ चांगले असतात आणि दीर्घकाळ टिकतात.

  • ग्रुप करुन प्रवास करावा

एकट्याने प्रवास करण्याऐवजी ग्रुप टूरच्या माध्यमातून प्रवास करावा. त्यामुळे खर्च कमी होतो आणि प्रवासादरम्यान पर्यावरणाची काळजी घेण्याचा सल्ला तुम्ही एकमेकांना देऊ शकता. एकट्याने प्रवास करताना गोंधळ उडू शकतो तसेच तब्बेत खराब होउ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com