Astro Tips of Broom Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips of Broom : शास्त्रात झाडूला इतके महत्व का? झाडू संबंधित या चुकांमुळे येऊ शकते आर्थिक संकट

Astro Tips of Broom : हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो असे मानले जाते.

दैनिक गोमन्तक

घर नियमितपणे स्वच्छ करणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छ घर हे देवी-देवतांचे, विशेषत: लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. पारंपारिकपणे, घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीचा वास झाडूमध्ये असतो असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रातही झाडूशी संबंधित अनेक मान्यता सांगितल्या आहेत. असे मानले जाते की या गोष्टींचा विचार केला नाही तर घरात गरीबी आणि दारिद्र्य येते.

(Astro Tips of Broom)

झाडूला पाय लागला तर काय करावे?

ज्योतिष आणि वास्तूशास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. कधी कधी आपले पाय झाडूवर पडतात. झाडूवर पाय ठेवणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. अशा स्थितीत जर कधी तुमचे पाय झाडूला लागले असतील तर हाताने झाडूला स्पर्श करून कपाळावर लावा आणि माता लक्ष्मीची क्षमा मागा.

झाडूशी संबंधित काही इतर नियम

  • वास्तूशास्त्रात सांगितले आहे की, झाडू कधीही उभा ठेवू नये. नेहमी तो आडवा करून ठेवावा. असे मानले जाते की उभ्या ठेवलेल्या झाडूमुळे घरामध्ये अशुभ होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

  • शास्त्रानुसार घरात वापरण्यात येणारा झाडू तोडू नये. घराचा झाडू तुटला किंवा खराब झाला तर तो ताबडतोब बदलावा. याशिवाय शुक्रवार आणि गुरुवारी झाडू घराबाहेर फेकू नका हे लक्षात ठेवा.

  • सूर्यास्तानंतर घरात झाडू वापरू नये असे शास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने घरात आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवल्यास आयुष्यात कधीही धनाची हानी होत नाही.

  • वास्तूशास्त्रात सांगितले आहे की, झाडू कधीही कपाटाच्या मागे किंवा तिजोरीच्या मागे ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे धनहानी होण्याची शक्यता वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT