Party Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Aryan Khan Case: रेव्ह पार्टी म्हणजे काय, आतले वातावरण नेमके कसे असते?

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ येथून अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ येथून अटक करण्यात आली आहे. या क्रूझवर कथित रेव्ह पार्टी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि त्याच्याकडून काही ड्रग्सही जप्त करण्यात आले आहे. बॉलिवूड आणि ड्रग्सचे जुने कनेक्शन असून रेव्ह पार्टीज देखील या कनेक्शनचा एक महत्त्वाचा भाग आहे. रेव्ह पार्ट्या काय असतात, कशा प्रकारे साजऱ्या केल्या जातात त्याबद्दल जाणून घेऊया.

रेव्ह पार्ट्या सहसा अत्यंत गुप्त पद्धतीने आयोजित केल्या जातात कारण बहुतेक पार्ट्या बेकायदेशीर ड्रग्जंनी भरलेल्या असण्याची शक्यता असते. अशाप्रकारच्या पार्ट्या सहसा शहराबाहेर किंवा सिक्रेट पध्दतीने आयोजित केल्या जातात. रंगीबेरंगी दिवे, बेकायदेशीर ड्रग्स, असंगतपणे नाचणारे लोक बऱ्याचदा रेव्ह पार्ट्यांमध्ये दिसतात. काही लोक या पार्ट्यांमध्ये फक्त नाचण्यासाठी येतात, तर काही लोक ड्रग्ज घेऊन नाचण्यामध्ये गुंग असतात.

दरम्यान अशा पार्ट्यांमध्ये एन्ट्री करणे भरपूर महाग असले तरी अशा स्थितीत श्रीमंत लोक बहुतांश या पार्ट्यांमध्ये दिसतात. अशा पार्ट्यांमध्ये सामान्यत:हा वेस्टर्न म्यूझिक (Western Music) वाजवले जाते. या संगीतामध्ये मात्र संगीताचे बोल गायब असतात. ड्रग्स घेतल्यानंतर अशा गाण्यांवर ठेका धरुन लोक बेधुंद होऊन नाचतात.

रेव्ह पार्टीमध्ये वेगळ्या प्रकारचे संगीत असते

जगभरात टेक्नो, सायकेडेलिक ट्रान्स, साय एम्बियंट, फॉरेस्ट, प्रोग्रेसिव्ह आणि डार्क ट्रान्स, हाऊस, अॅसिड पॉप असे संगीत प्रकार आहेत जे या पार्ट्यांमधून ऐकायला येतात. या पार्ट्यांमध्ये संगीताला लोक जास्त महत्त्व देतात. उदाहरणार्थ, बर्लिन (Berlin) या जर्मन शहरात बऱ्याच टेक्नो पार्ट्या आयोजित केल्या जातात. तसेच अनेक संगीत महोत्सव जंगलात किंवा निसर्गाच्या सानिध्यात साजरे केले जातात. जसे की ओझोरा, बूम आणि शम्बाला महोत्सव, फक्त ट्रान्स, डाउनटेम्पो एम्बियंट आणि सायकेडेलिक शैली ऐकल्या जातात.

रेव्ह पार्टीला जाण्याचे बरेच धोके

जगातील काही देश असे आहेत जे रेव्ह पार्टीला कमाईचे स्त्रोत मानतात आणि या देशांमध्ये सरकारचा अशा पार्ट्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मवाळ स्वरुपाचा असतो. परंतु भारतामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये तसे काही होत नाही. अशा पार्ट्यांमध्ये जमा झालेले लोक सहसा आपल्याच धुंदीत असतात. दुसरीकडे मात्र अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशा बेकायदेशीर पार्ट्यांवर NCB किंवा पोलिसांकडून छापे टाकले जातात. गेल्या दशकात मुंबईतील अनेक हायप्रोफाईल ठिकाणी छापे पडल्याच्या बातम्याही तुम्ही वाचल्या असतील. ड्रग्सबाबत भारतातील कायदे अत्यंत कडक असल्याने, जर अशा पार्ट्यांवर छापा टाकण्यात आला तर लोक बऱ्याच मोठ्या कालावधी कारागृहामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे लोकांच्या करिअरवर देखील प्रचंड नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हार्ड ड्रग्ज सेवन केल्याने तरुणांनाही या ड्रग्सचे व्यसन लागू शकते, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य खराब होण्याची शक्यता देखील वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT