Antidepressants  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

"Antidepressants च्या दुष्परिणांबद्दल त्यांनी सांगितलेच नाही..." डिप्रेशनमुळे आत्महत्या केलेल्या तरूणाची व्यथा

Puja Bonkile

Antidepressants: डिप्रेशन हा अलीकडच्या काळात सर्वसामान्य झालेला आजार आहे. त्यावर लोक आपापल्या डॉक्टरकडून, मानसोपचारतज्ज्ञांकडून औषधोपचार घेत असतात. अनेक डॉक्टर अशा रूग्णांना अँटीडिप्रेसंट्स लिहून देतात.

पण, अशा या औषधांचे साईड इफेक्टसही असू शकतात आणि त्यामुळे एखाद्याला जीवाला देखील मुकावे लागू शकते. त्यामुळेच अँटीडिप्रेसंट्सचा वापर करताना, किंवा ते बदलताना मानवी शरीरावर, मानसिकतेवर होणाऱ्या त्याच्या साईड इफेक्ट्सबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

नुकतेच इंग्लंडमध्ये अँटीडिप्रेसंट्सचा वापर करणाऱ्या एका युवकाने अँटीडिप्रेसंटसच्या वापरातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत चर्चा होऊ लागली आहे. डिप्रेशनवर औषध घेताय? डिप्रेशनवर का येते ? याबद्दल जाणून घेऊया सविस्तरपणे.

त्याच्या आईने सांगितले की, जेव्हा त्याचे औषध बदलले तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही दुष्परिणामांबद्दल माहिती दिली नव्हती.

पुढे त्या म्हणतात की, त्यांच्या मुलाला भेटायला गेल्या होत्या पण त्यांना बरे वाटण्यापूर्वी नवीन औषधामुळे त्याला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असे त्यांना सांगितले गेले नाही.त्या म्हणाल्या की त्यांना असेही सांगण्यात आले होते की नवीन अँटीडिप्रेसंटवर असताना अल्कोहोल पिणे ठीक आहे.

एनएचओसच्या मार्गदर्शनामनुसार सर्टलाइन सुरू करताना अल्कोहोल टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

सिओनेड म्हणाल्या की 2015 मध्ये त्याच्या मुलाने स्वतःचा जीव गमावला कारण आदल्या रात्री त्याने मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले होत.

Seonaid and Dylan Stallans

त्या म्हणतात की डिलनने सर्टलाइन सुरू करण्यापूर्वी कोणताही आत्महत्येचा विचार व्यक्त केला नव्हता.

सिओनाईड म्हणतात "आमच्यापैकी कोणीही खात्रीने सांगू शकत नाही की काय झाले असते" जर त्यांना आणि डायलनला अल्कोहोल पिण्याच्या विपरित परिणामांबद्दल सांगितले गेले असते. परंतु त्यांना असे वाटते की मिळालेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या मुलाला जीव गमवावा लागला आहे.

ज्या खाजगी दवाखान्यात डायलनवर उपचार करण्यात आले होते त्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, त्यांच्या मृत्यूमुळे ते "खूप दुःखी" झाले आहे आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. परंतु, लंडनममध्ये 18 वर्षांवरील लोकांना डिलनप्रमाणे अँटीडिप्रेसस औषध लिहून दिले जाऊ शकते. पण 18-24 वर्षे वयोगटातील लोक जेव्हा ही औषधे घेतात तेव्हा त्यांच्या आत्महत्येचा धोका वाढतो असी सुचना काही क्लिनिकमध्ये दिली जाते.

डिप्रेशन येण्याची कारणे कोणती?

  • एकटेपणा

गर्दीतही एकटेपणा आणि दुःखी वाटणारी व्यक्ती नैराश्याची शिकार होऊ शकते. नैराश्यामुळे व्यक्ती समाजापासून दुरावलेली राहते. सतत विचारात गढून जाणे ही मग सवय बनते.

  • विनाकारण राग येणे

जास्त राग हे नैराश्याचे सर्वात महत्वाचे लक्षण असू शकते. नैराश्यामुळे माणसाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येऊ शकतो. अनेक वेळा, विनाकारण एखादी व्यक्ती ओरडायला लागते.

  • झोपेचा त्रास

मेंदूच्या विकासासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. दर्जेदार झोप न मिळाल्याने मेंदू सतत काम करत राहतो, ज्यामुळे भविष्यात नैराश्य येऊ शकते. ज्या लोकांना झोपेचा त्रास होतो ते डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात.

  • भूक न लागणे किंवा जास्त खाणे

नैराश्यामुळे अनेकांची भूक कमी होते. समोर आवडते पदार्थ असूनही लोक ते खाण्यास नकार देऊ लागतात. त्याच वेळी काही लोक नैराश्यामुळे जास्त खाणे सुरू करतात. अशा स्थितीत राग येताना भूक वाढू लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

SCROLL FOR NEXT