AC Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

AC Side Effects: दिवसभर खाता एसीची हवा ? 'या' 5 गंभीर आजारांना पडू शकता बळी

दिवसभर एसीमध्ये राहिल्याने तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दैनिक गोमन्तक

AC Side Effects: अनेक लोकांच्या घरात एअर कंडिशनर म्हणजेच एसी बसवले आहेत. एसी मध्ये बसल्यावर आपल्याला उष्णाच्या झळा जाणवत नाही. मे-जूनच्या उन्हात डिसेंबर-जानेवारीसारखी थंडी अनुभवायला मिळते यात शंका नाही. पण काही लोकांना दिवसभर एसीमध्ये बसण्याची सवय असते. 

थोडावेळही उन्हाचा सामना करावा लागला तर ते अस्वस्थ होतात. एसी तुम्हाला उष्णतेपासून आराम देण्याचे काम करते. पण तुम्हाला माहित आहे का की दिवसभर एसीमध्ये राहिल्याने तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एअर कंडिशनिंगमध्ये जास्त वेळ राहिल्याने तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घेउया.

  • अशक्तपणा

एका संशोधनानुसार, ज्या लोकांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये एअर कंडिशनर आहेत त्यांना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. तुम्ही एसीमध्ये जास्तवेळ राहिल्यास तुम्हाला अधिक सुस्त वाटू शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही एसीचा वापरा कमी करु शकता.

  • डिहायड्रेशन

एसीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दिसून येते. डिहायड्रेशन हा एक धोकादायक आजार आहे, ज्याकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला अनेक समस्यांनी घेरले जाऊ शकते. 

  • त्वाचा कोरडी पडते

एसीमध्ये जास्त वेळ राहणाऱ्या लोकांच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. तुमची त्वचा कोरडी पडु शकते आणि खाज सुटू शकते. अनेकवेळा डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी पडते.

AC
  • डोकेदुखी

जे लोक आपला बराच वेळ एअर कंडिशनिंगमध्ये घालवतात त्यांना डोकेदुखी होऊ शकते. कारण एअर कंडिशनिंगमुळे खोलीतील वातावरण कोरडे होते, त्यामुळे लोकांना डिहायड्रेशन जाणवू लागते आणि त्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होउ शकते.

  • श्वसनाच्या समस्या

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे, विशेषत: नाक आणि घशात श्वसनाच्या समस्या सुरू होऊ शकतात. या समस्यांमध्ये सहसा नाक बंद होणे, घसा कोरडा होणे किंवा नासिकाशोथ यांचा समावेश होतो. वातानुकूलित यंत्रणा खूप कोरडी असल्याने घशात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

SCROLL FOR NEXT