Meditation For Diabetes: काय सांगता? ध्यान-योगामुळेही मधुमेह होतो कमी; संशोधनानुसार...

योग आणि ध्यान हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषधांसारखेच काम करतात.
Meditation For Diabetes
Meditation For DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

Meditation For Diabetes: मधुमेह हे अनेक रोगांचे मूळ आहे. मधुमेहाच्या स्थितीत रक्तातील साखरेचे म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण वाढते त्यामुळे हे वाढलेले ग्लुकोज संपूर्ण रक्तात आणि नसांमध्ये पसरू लागते आणि यामुळे हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होतो.

इन्सुलिन वाढवण्यासाठी आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यासाठी सकस आहार आणि औषधे घेतली जातात.

औषध रक्तात ग्लुकोज लवकर वाढू देत नाही. इथे एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखण्यासाठी मेडिटेशन औषधापेक्षा जास्त काम करते.

ध्यान आणि योग ही भारताची शतकानुशतके जुनी परंपरा आहे, जी आजकाल संपूर्ण जगामध्ये पसरली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने 28 वेगवेगळ्या अभ्यासांचे विश्लेषण केले आणि त्यातून असे आढळले की योग आणि ध्यान हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषधांसारखेच काम करतात.

Meditation For Diabetes
Astrology Tips: कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात कामं होत नाहीत? मग शास्त्रातील 'हे' उपाय ठरतील प्रभावी

योग-ध्यान केल्याने रक्तातील ग्लुकोज कमी होते

ग्लोबल डायबिटीज कम्युनिटीच्या वेबसाइटनुसार, या संशोधनामध्ये अशा लोकांचा समावेश करण्यात आला ज्यांना टाइप 2 मधुमेह आहे आणि ते रक्तातील साखर कमी करण्यासाठी नवीन जीवनशैलीचे तंत्र वापरत होते.

यामध्ये ते औषधांसोबतच ध्यान आणि योगासनेही करत होते. यासोबतच काही जण क्यूई गॉन्ग या प्राचीन चिनी मार्शल आर्टचाही सराव करत होते. संशोधकांनी त्या सर्वांचे एकत्रित विश्लेषण केले. एकीकडे केवळ ध्यान आणि योगासने करणार्‍या मधुमेही रुग्णांच्या आरोग्याचे आणि रक्तातील साखरेचे विश्लेषण करण्यात आले.

तर दुसरीकडे केवळ औषधे घेणारे होते. अभ्यासात असे आढळून आले की टाइप 2 मधुमेहाने ग्रस्त लोक जे ध्यान, योग आणि क्यूई गॉन्ग तंत्र वापरत होते त्यांची HbA1c पातळी म्हणजेच रक्तातील ग्लुकोजची पातळी 0.8 टक्क्यांनी कमी झाली.

योग सर्वात प्रभावी

या सर्व तंत्रांमध्ये योगाचा सर्वाधिक परिणाम झाला. या अभ्यासात असे आढळून आले की, मधुमेहावरील मेटफॉर्मिन हे औषध रक्तातील साखर कमी करण्यासाठी जेवढे प्रभावी आहे, तेवढाच परिणाम योगाचाही होतो.

योगामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या लोकसंख्या आणि सार्वजनिक आरोग्य विज्ञान विभागाच्या अभ्यासानुसार, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्राचीन पद्धतीचे बरेच फायदे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com