Goan Ros Omelette Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Goan Ros Omelette: तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? तर मग ट्राय करा; गोवन स्पेशल रेसिपी 'रोस ऑम्लेट'

Goan Ros Omelette: गोव्यातील अत्यंत लोकप्रिय असा पदार्थाची सोपी रेसिपी जाणून घ्या.

Shreya Dewalkar

Goan Ros Omelette: दरोजच्या ब्रेकफास्टला काय करायचे प्रश्न पडत असेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत गोवन स्पेशल रेसिपी रोस ऑम्लेट गोव्यातील अत्यंत लोकप्रिय आश्या पदार्थाची सोपी रेसिपी जाणून घ्या.

रोस

साहित्य

  • 1 टेबलस्पून नारळ तेल

  • 1 छोटा पिवळा कांदा, बारीक चिरलेला

  • 1 मध्यम टोमॅटो, बारीक चिरलेला

  • 1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

  • 1 टीस्पून हळद

  • ½ टीस्पून काश्मिरी किंवा इतर लाल मिरची पावडर

  • 1 टेबलस्पून नारळाची पेस्ट

  • 1 टीस्पून गरम मसाला

रोस बनवण्याची कृती:

मध्यम कढईत, मध्यम-उच्च आचेवर, सुमारे 2 मिनिटे तेल गरम करा. कांदा घाला सोनेरी होईपर्यंत, सुमारे 5 मिनिटे परता.

टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, हळद, आणि चिली पावडर घालून परतावे, अधूनमधून ढवळत राहा, जोपर्यंत टोमॅटोला तेल सुटत नाही तोपर्यंत, सुमारे 5 मिनिटे.

नारळाची पेस्ट आणि गरम मसाला, मीठ घालून नीट ढवळून घ्या सुमारे 5 मिनिटानंतर ग्रेव्हीत आवश्यक असल्यास, थोडे पाणी घाला.

ऑम्लेट:

साहित्य:

  • 2-3 अंडी

  • 1 छोटा कांदा, बारीक चिरलेला

  • 1 हिरवी मिरची, बारीक चिरलेली

  • 1 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली

  • चवीनुसार मीठ आणि मिरपूड

  • स्वयंपाकासाठी तेल किंवा लोणी

कृती:

अंडी फेटा:

एका भांड्यात अंड चांगले फेटून फेटा.

साहित्य घाला:

फेटलेल्या अंड्यांमध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड घाला. चांगले मिसळा.

आमलेट शिजवा:

कढईत तेल किंवा बटर गरम करा, अंड्याचे मिश्रण पॅनमध्ये घाला. कडा सेट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.

फोल्ड करा आणि सर्व्ह करा:

कडा सेट केल्यावर, आम्लेटला हलक्या हाताने दुमडून घ्या. ते पूर्णपणे सेट होईपर्यंत शिजवा आता, तुम्ही रोस करी आणि ऑम्लेट सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT