Manikrao Thackeray: काँग्रेस जनतेवर उमेदवार लादणार नाही!

Manikrao Thackeray : ‘गोमन्तक टीव्ही’वरील कार्यक्रमात सूतोवाच
Manikrao Thakare
Manikrao ThakareDainik Gomantak
Published on
Updated on

Manikrao Thackeray : खोट्या गोष्टी जनतेमध्ये कशा रुजवायच्या, हे भाजपचे तंत्र आहे. येथील मुख्यमंत्री लोकसभेच्या दोन्ही जागा अमूक एवढ्या मतांनी निवडून येणार, असा दावा करीत आहेत. वारंवार खोटे सांगून लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न आजपर्यंत भाजप करत आला आहे आणि मुख्यमंत्रीही तेच करत आहेत.

Manikrao Thakare
Goa Accident Case: नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झाली भीषण अपघातांची मालिका; 14 जणांनी गमावले प्राण

काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार जनतेवर लादणार नाही, तर सर्वांच्या मताने आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवारच रिंगणात उतरविला जाईल, असे काँग्रेसचे नवनियुक्त गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली. नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या राज्यात निर्विवाद सत्ता आणली, त्या तेलंगण राज्याचे प्रभारीपद सांभाळल्यानंतर ठाकरे यांच्याकडे गोव्यातील काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या मुलाखतीत सुरुवातीलाच ठाकरे यांनी ‘केसीआर’च्या राजकारणामुळे तेलंगणातील काँग्रेसची झालेली दयनीय स्थिती आणि त्यानंतर एकहाती सत्ता मिळविण्यापर्यंत काँग्रेसला मिळालेले यश यावर प्रकाश टाकला. तेथे सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचे कौशल्य दाखविले, सर्वांना विश्‍वास दिला.

तसाच प्रयत्न गोव्यात करावा लागेल. सर्वच पक्षांत राजकीय संघर्ष आहे; पण सर्वांशी संवाद राखणे महत्त्वाचे आहे. कार्यकर्त्यांना विश्‍वास देणे आवश्‍यक आहे, नेतृत्वाने एका नजरेने सर्वांना पाहणे आवश्‍यक आहे. तेलंगणात मी तब्बल 11 महिने मुक्कामी होतो. सर्व सणही तेथेच साजरे केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

Manikrao Thakare
Babush Monserrate:स्मार्ट सिटीची जबाबदारी... बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा झटकले हात

आम्ही तेलंगणामध्ये तेच केल्याचे सांगत काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये एकनिष्ठता दिसत नाही, या प्रश्‍नावर ठाकरे म्हणतात, सत्ता ही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानेच येते. आमची सत्ता येणार आहे आणि आम्ही मजबूतपणे पुढे जाणार आहोत, हे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबविले पाहिजे. तेलंगणामध्ये सत्ता होती तिकडे काँग्रेसचे आमदार गेले; पण पुन्हा ते निवडून आलेले नाहीत, हेही त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांच्या शंका दूर करू!

खोट्या गोष्टी जनतेमध्ये कशा रुजवायच्या, हे भाजपचे तंत्र आहे. येथील मुख्यमंत्री लोकसभेच्या दोन्ही जागा अमूक एवढ्या मतांनी निवडून येणार, असा दावा करीत आहेत. वारंवार खोटे सांगून लोकांच्या मनावर ते बिंबवण्याचा प्रयत्न आजपर्यंत भाजप करत आला आहे आणि मुख्यमंत्रीही तेच करत आहेत.

काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवरील उमेदवार जनतेवर लादणार नाही, तर सर्वांच्या मताने आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवारच रिंगणात उतरविला जाईल, असे काँग्रेसचे नवनियुक्त गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली. नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या राज्यात निर्विवाद सत्ता आणली, त्या तेलंगण राज्याचे प्रभारीपद सांभाळल्यानंतर ठाकरे यांच्याकडे गोव्यातील पान १५ वर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com