Bull Attack Case: छातीची चाळण, पायांनाही मार; तरीही पोलिस म्‍हणतात तो धीरयोतील बैल नाही!

Bull Attack Case: बैलाचे शिंग काळजात घुसल्‍यानेच ज्योविटोचा मृत्‍यू
Bull Attack :
Bull Attack : Dainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

Bull Attack Case: बाणावली येथे सोमवारी वार्का येथील ज्‍योविटो वाझ (वय ४१) या युवकाचा मृत्‍यू धीरयोतील बैलाने शिंग खुपसल्‍याने नव्‍हे, तर गोठ्यातील गुरांनी हल्‍ला केल्‍यामुळे झाल्याचा दावा काेलवा पाेलिस वाझ कुटुंबीयांच्‍या सांगण्‍यावरून करत आहेत.

Bull Attack :
Babush Monserrate:स्मार्ट सिटीची जबाबदारी... बाबूश मोन्सेरात यांनी पुन्हा झटकले हात

असे असले, तरी मंगळवारी त्‍याच्‍या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता, बैलाच्‍या शिंगाचा जबरदस्त आघात झाल्‍यामुळे त्‍याची छाती पूर्णत: छिन्नविछिन्न होऊन शिंग काळजात घुसल्‍याने त्याचा मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. शिवाय ज्‍योविटोच्‍या पायालाही गंभीर दुखापत झाल्‍याचे दिसून आले आहे. ``

त्‍यामुळे खरेच हा गोठ्यात बांधलेल्‍या बैलाचा हल्‍ला की, मैदानावर उधळलेल्‍या बैलाने केलेला आघात, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार, प्रारंभी ज्‍योविटो जखमी झाल्‍यानंतर त्‍याला शासकीय इस्‍पितळात न नेता खासगी इस्‍पितळात दाखल केले.

Bull Attack :
Babush Monserrate: उत्पलप्रश्‍नी बाजू सावरण्यावर भर...

तिथे त्‍याला मृत जाहीर केल्‍याने नंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्‍यासाठी त्याला दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात हलविण्‍यात आले. शवविच्छेदन रात्रीच करून मृतदेह वाझ कुटुंबीयांच्‍या स्‍वाधीन करावा, यासाठी एका स्‍थानिक राजकारण्‍याने इस्‍पितळ प्रशासनावर दबाव आणण्‍याचाही प्रयत्‍न केला.

मात्र, कायद्याने रात्रीच्‍यावेळी पोस्‍टमार्टम करता येत नाही. त्‍यामुळे हा प्रयत्‍न फाेल ठरला. मंगळवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्‍यात आली.

पंचनाम्यातील माहिती गुलदस्त्यात

वाझ कुटुंबीयांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे ज्‍योविटोचा मृत्‍यू गाेठ्यातील बैलाने केलेल्‍या हल्‍ल्‍यामुळेच झाला की नाही, याची खात्री करून घेण्‍यासाठी आज (मंगळवारी) काेलवा पोलिसांनी कथित घटनास्‍थळावर जाऊन पंचनामा केला, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, पंचनाम्‍यावेळी पोलिसांना नेमके काय दिसून आले, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.

अखेर धीरयोमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा नोंद

बाणावलीतील सर्वांना काय झाले हे माहीत असूनही ज्योविटो वाझ याचा मृत्यू धीरयोतील बैलाने केलेल्या हल्ल्यामुळे नव्हे, तर गोठ्यात बांधलेल्या बैलाने केलेल्या हल्ल्यामुळे, अशी भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी या धीरयोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भूमिका बदलत अज्ञात धीरयो आयोजकांवर रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा (कलम ३०४ ब) गुन्हा नोंद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com