Pigeon  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: कबुतराचे एक पंख तुम्हाला मालामाल करेल, घरात या दिशेला ठेवा

कबुतराच्या पिसांपासून केलेले काही उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. कबुतराच्या पिसांबद्दल (pigeon wing) अशीच महत्वाची माहिती आज तुम्हाला देणार आहोत. जर तुमच्या घरी कबूतर येत असतील तर ते खूप शुभ असू शकते. कबुतराच्या पिसांपासून केलेले काही उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात.

तुम्हाला पैशांची कमतरता भासत असेल तर कबुतराचे पंख तुमच्या समस्येवर मात करू शकतात. कबुतराचे पंख घराच्या तिजोरीत ठेवा. कबुतराचे पंख पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळून लक्ष्मीचे ध्यान करा आणि त्यानंतर लाल धागा बांधून धनाच्या ठिकाणी ठेवा. पण, ज्या ठिकाणी कबुतराचे पंख ठेवत आहात ती जागा इतर कोणतीही व्यक्ती पाहणार नाही याची काळजी घ्या.

तुमच्या घरात कबूतर येत-जात असतील तर ते खूप शुभ मानले जाते. कारण कबुतराला देवाचा संदेशवाहक म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, घरात कबुतराचे आगमन शुभ मानले जाते.

कबूतर तुमच्या घरात अंडी घालत असतील तर याचा अर्थ तुम्हाला खूप चांगली बातमी मिळणार आहे.

कबुतराचे पंख तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवून देऊ शकते. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत कबुतराचे पंख ठेवा. लिव्हिंग रूमच्या दक्षिण कोपऱ्यात एक, स्वयंपाकघराच्या उत्तर कोपऱ्यात एक आणि बेडरूमच्या पूर्वेकडील कोपऱ्यात एक पंख ठेवा. असे केल्याने बाहेर रखडलेले पैसे परत येतील आणि पैशाची कमतरता पूर्ण होईल.

नोकरीच्या शोधात असलेल्यांनी गुरुवारी कबुतराच्या पिसाला पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गोळा गुंडाळून ते तिजोरीत ठेवावे. त्यामुळे लवकर रोजगार आणि व्यवसायात नफा मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

Bicholim Library: 40 वर्षांचा इतिहास असलेल्या डिचोलीतील वाचनालयाची शोकांतिका, कायमस्वरूपी जागेच्या प्रतीक्षेत

Mormugao: वास्कोत दोन कंत्राटदारांमध्ये संघर्ष, कचरा उचल कामावर परिणाम; कारभार सुधारण्यास पालिकेकडून 15 दिवसांचा अवधी

Goa Live News: मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनदिनी मतदारसंघातील भगिनींचा गराडा

Benaulim: ..उबर ॲप वापरले, टॅक्सीचालकाला केले पोलिसांच्या हवाली; बाणावलीत स्थानिक व्यावसायिक संतप्त

SCROLL FOR NEXT