सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शनाचा सोहळा सध्या सुरु आहे.
या सोहळ्याचा भाग म्हणून 'गोवा आणि दमण आर्कडायोसिस'तर्फे ओल्ड गोवा येथील सेंट जॉन ऑफ गॉड या ऐतिहासिक कॉन्व्हेंटमध्ये 'फुटप्रिन्ट्स ऑफ होप' या नावाने कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध 62 कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
समकालीन प्रसंगावर भर देऊन क्युरेट केलेले हे प्रदर्शन विविध कलाकृतींच्या माध्यमातून दर्शकांना एक चिंतनशील अनुभूती देते
सोहळ्याच्या गर्दीत हे प्रदर्शन कलारसिकांना एक वेगळा अवकाश प्रदान करते.
गोमंतकीयांसाठी झेवियरचा वारसा या प्रदेशाच्या इतिहासाची जोडलेला आहे.
हे प्रदर्शन भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आदर वृद्धिंगत करण्यासाठी दर्शकांना प्रेरणा देऊ शकते असे क्युरेटर फादर डेलीयो मेंडोसा यांनी सांगितले.
हे प्रदर्शन अवशेष सोहळ्याच्या समांतर चालणार असून 5 जानेवारी 2025 पर्यंत ते सर्व लोकांसाठी खुले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.