Virat Kohli Dainik Gomantak
Image Story

Virat Kohli: रन मशीन विराटने वनडे क्रिकेटमध्ये गाठला 14000 धावांचा टप्पा! पाकिस्तानविरुद्ध केली ऐतिहासिक कामगिरी

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विक्रम

Manish Jadhav
Virat Kohli

किंग कोहली

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला दुसरा सामना खेळत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. विराटने एका खास यादीत जगातील सर्व फलंदाजांना मागे टाकले. त्याने असा एक विक्रम केला जो आतापर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते.

Virat Kohli

ऐतिहासिक कामगिरी

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 15 धावा करुन विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पा गाठला. विराट हा जगातील तिसरा फलंदाज आहे, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठला. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांनी ही कामगिरी केली होती. पण विराटने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 14000 धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरने 359 व्या सामन्यातील 350व्या डावात ही कामगिरी केली होती. तर, विराटने 299व्या सामन्यातील 287व्या डावात ही किमया साधली.

Virat Kohli

विराटची शानदार कामगिरी

दरम्यान, विराटच्या आधी सचिन तेंडुलकरनेही पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एकदिवसीय सामन्यात 14000 धावा पूर्ण केल्या होत्या. सचिनने 6 फेब्रुवारी 2006 रोजी पेशावर येथे ही कामगिरी केली होती. आता, विराटने दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध हाच पराक्रम पुन्हा केला. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुमार संगकारा 14234 धावांसह दुसऱ्या स्थानी असून सचिन 18426 धावांसह पहिल्या स्थानी आहे.

Virat Kohli

सर्वाधिक शतके

विराट हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये अनेक मोठ्या कामगिरी केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 50 शतके झळकावली आहेत. या यादीतही त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT