राज्यात दिवसेंदिवस आपघाताचं प्रमाण वाढतच आहे, वाहतूक व्यवस्थापनाने (Goa Transport Department ) नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपाणे वागताना दिसून येतात, वारंवार नियमांच उल्लंघन होताना दिसून येते. नगरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी काही प्रश्नमंजुषा घेण्यात आली दरम्यान विजेत्यांना हेल्मेट वितरण करताना मंत्री माविन गुदिन्हो. संदीप देसाई
नगरिकांना आवाहन करताना मंत्री माविन गुदिन्हो.वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने यावर तोडगा काढत वाहतुकव्यवस्थापन खात्याने जनजागृतीसाठी एक खास उपक्रम राबावला आहे. राज्य रास्ता सुरक्षा आठवड्याच्या निमित्ताने हा उपक्रम चालू करण्यात अला आहे. हा उपक्रम 25 ऑक्टोम्बर पर्यंन्त राज्यात ठीक-ठिकाणी दिसून येणार आहे. 'वाहन चालवताना नियमांचे पालन करा नहीतर हा यम तुम्हाला न्यायला आलाय' असा काहीसा संदेश या थीम मधून देण्याचा प्रयत्न वाहतूक व्यवस्थापन विभागाने केला आहे. दरम्यान 'यमाचा' अवतार घेऊन आलेल्या कलाकाराने नगरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.