अग्निष्टोम महासोमयाग स्थळी सोमवारी ‘प्रवर्ग्य विधी’ अनुभवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अध्यात्मासोबतच यज्ञ ही संकल्पना समजून घेणाऱ्यांची संख्याही दुसऱ्या दिवशी लक्षणीय होती.
सोमयागातील प्रवर्ग्य विधी हा चित्ताकर्षित करणारा ठरतो. या विधीत मातीच्या छोट्या पात्रात (महावीर) तूप उत्कलन बिंदूपर्यंत तापवले जाते.
मंत्रोच्चाराच्या माध्यमातून प्रज्वलित होणारा अग्नी व त्याची 30 फूट उंच उसळणारी ज्वाळा पाहण्यासाठी सभामंडपात भक्तांनी एकच गर्दी केली होती.
महासोमयागाच्या ठिकाणी हवनकुंड अर्थात यज्ञवेदीला परिक्रमा करण्यासाठी हवनकुंडांना प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे.
गाईचे व शेळीचे दूध काढून ते महावीर पात्रातील तुपावर ओतले गेले. यावेळी अग्निज्वाळा 25 ते 30 फुटापर्यंत उंच उसळल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.