Oman vs Namibia Dainik Gomantak
Image Story

ODI Cricket: फिरकीची जादू! वनडे क्रिकेटमध्ये बनला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा 'हा' संघ ठरला जगातील पहिलाच

Manish Jadhav
Oman vs Namibia

वर्ल्ड रेकॉर्ड

एकीकडे, जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर केंद्रित आहेत. दुसरीकडे, अल अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात असा एक रेकॉर्ड झाला, जो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

Oman vs Namibia

नामिबिया विरुद्ध ओमान

दरम्यान, हा सामना नामिबिया आणि ओमान यांच्यात खेळला गेला. ओमानने हा सामना 2 विकेट्सने जिंकला. पण या सामन्यादरम्यान ओमानने एक अद्भुत रेकॉर्ड केला. या सामन्यात ओमानच्या एकाही वेगवान गोलंदाजाने गोलंदाजी केली नाही, त्यांच्या फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी नामिबियाला 96 धावांत गुंडाळले. अशारितीने ओमान हा जगातील पहिला संघ बनला, ज्याने वेगवान गोलंदाजाचा वापर न करता सर्व 10 विकेट्स घेतल्या.

Oman vs Namibia

ओमानच्या फिरकीपटूंची कमाल

ओमानने नामिबियाविरुद्ध पहिल्यांदा गोलंदाजी केली आणि पहिले षटक ऑफ-स्पिनर जय ओडेरा याने टाकले. त्याच्यासोबत डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज शकील अहमद गोलंदाजी करताना दिसला. या दोघांनी मिळून नामिबियाच्या 6 विकेट्स घेतल्या. आमिर कलीमनेही 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय, सिद्धार्थ बुक्कापट्टणम आणि समय श्रीवास्तव यांना प्रत्येकी 1 विकेट्स घेतली. संपूर्ण नामिबिया संघ 33.1 षटकांत 96 धावांवर ऑलआउट झाला.

Oman vs Namibia

97 धावांचे लक्ष्य

ओमानकडे कमी लक्ष्य होते, पण तरीही 97 धावांचे लक्ष्य गाठण्यात त्यांना खूप अडचणी आल्या. आमिर कलीम आणि जतिंदर सिंग यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पण जतिंदर सिंग बाद होताच परिस्थिती बदलली. 42 धावांवर पहिली विकेट गमावणाऱ्या ओमान संघाने लवकरच 79 धावांवर 5 विकेट्स गमावल्या. यानंतर, 87 धावांत 8 विकेट्स पडल्या. शेवटी, हशीर दफेदार आणि सिद्धार्थ यांनी सयंमी फलंदाजी करत ओमानला विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT