Marcus Stoinis Retirement Dainik Gomantak
Image Story

Marcus Stoinis Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; मार्कस स्टॉइनिसची तडकाफडकी निवृत्ती

Marcus Stoinis: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar
Marcus Stoinis Retirement

मार्कस स्टॉइनिस

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याची निवड करण्यात आली. पण त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Marcus Stoinis Retirement

डर्बन सुपर जायंट्स

ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडावा लागेल. स्टॉइनिस सध्या SA20 मध्ये डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे.

Marcus Stoinis Retirement

टी-२० क्रिकेट खेळणार

स्टॉइनिस 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळणारा स्टॉइनिस आता केवळ टी-२० क्रिकेट खेळणार आहे.

Marcus Stoinis Retirement

७१ एकदिवसीय सामने

मार्कस स्टॉइनिस त्याच्या कारकिर्दीत ७१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६४ डावांमध्ये त्याने २६.६९ च्या सरासरीने १४९५ धावा केल्या, ज्यामध्ये १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

Marcus Stoinis Retirement

सर्वोच्च धावसंख्या

एकदिवसीय सामन्यात स्टॉइनिसची सर्वोच्च धावसंख्या १४६* धावा आहे. याशिवाय, ६४ डावांमध्ये गोलंदाजी करताना, स्टोइनिसने ४३.१२ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम आकडा ३/१६ होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liberation Day 2025: स्वातंत्र्यसैनिकांनी लढून मुक्त केलेला गोवा आपण कसा राखला पाहिजे, याची किमान जाणीव व्हावी....

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

SCROLL FOR NEXT