जाणून घ्या गोव्यातील गौरी पूजनची माहिती  Dainik Gomantak
Image Story

Ganesh Festival 2021: जाणून घ्या गोव्यातील गौरी पूजनची माहिती

गोव्यामधील गौरी पूजनाची थोडी भिन्नता आहे. कोकणामध्ये गौरी निमित्ताने गौरी मुर्तीचेही पूजन केले जाते. पण सत्तरीत आणि डिचोली, पेडणे आणि दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये ही गौरी पूजन थोडे वेगळे आहे.

Shreya Dewalkar

जाणून घ्या गोव्यातील गौरी पूजन कसे असते

चतुर्थीच्या दरम्यान साधारण पाचव्या दिवशी गौरी पूजन केले जाते हे गौरी पूजन सत्तरीतील मुख्य आकर्षण आहे. सत्तरीतील बऱ्याच गावांमध्ये गौरी पूजन केले जाते. कोकणातील गौरी पूजन आणि गोव्यामधील गौरी पूजनाची थोडी भिन्नता आहे. कोकणामध्ये गौरी निमित्ताने गौरी मुर्तीचेही पूजन केले जाते. पण सत्तरीत आणि डिचोली, पेडणे आणि दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये ही गौरी पूजन थोडे वेगळे आहे.

येथे गौरी पुजनाची परंपरा म्हणजे, घरातील सुहासिनी महिला पाचव्या दिवशी सकाळी तांब्याच्या कलशातून नदी-विहिरीवरील पाणी घरी घेऊन येते व त्याची गणपती समोर पूजा अर्चा केली जाते, त्यानंतर गौरीचे 'हवशे' होतात. हवशे हे हळदीच्या पानावर मुगाची डाळ व इतर फळांचे तुकडे घातलेला नैवेद्य असतो. तो देवीला अर्पण केल्यानंतर घरातील महिला गावात फिरून याचे वाटप करतात. नंतर संध्याकाळी त्यांची पुन्हा आणलेल्या ठिकाणी विसर्जन होते. या गौरी पुजनावेळी कलशातून पाणी आणणे आणि त्याचे विसर्जन करते वेळी सर्वजण एकत्रित जमतात तर दुपारच्या सत्रात महिला हवशे घेऊन घरोघरी जात असतात.

विहिरीवर गौरी चे पाणी भरताना सुहासिनी
गौरी निमित्त हवशे वाटप असते, महिला अशा गावोगावी फिरून याचे वाटप करतात
कोकणामध्ये गौरी निमित्ताने गौरी मुर्तीचेही पूजन केले जाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT