Irrfan Khan Dainik Gomantak
Image Story

Irrfan Khan Death Anniversary : अभिनयाची नवी भाषा शिकवून गेलेला इरफान

अभिनेता इरफान खान याचा आज स्मृतीदिन त्यानिमीत्ताने त्याची गोष्ट पाहुया फोटोंच्या माध्यमातून

Rahul sadolikar

इरफान खानने 29 एप्रिल 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला. तो भारतीय चित्रपटांमधला एक सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होता. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. आज त्याच्या स्मृतीदिनी चला पाहुया त्याचा प्रवास - वैयक्तिक आणि करिअरमधल्या काही खास क्षणचित्रांमधुन

७ जानेवारी १९६७ रोजी जन्मलेल्या इरफानचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. श्रीमंत रूढिवादी मुस्लिम कुटुंबात जन्मलेले, त्यांचे वडील जहागीरदार खान टायर्सचा व्यवसाय करायचे. त्यांना इम्रान खान आणि सलमान खान हे दोन भाऊ,आणि रुखसाना बेगम नावाची एक बहीण होती. 

Irrfan Khan

इरफान खान त्याच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखले जात होता, परंतु एक विद्यार्थी म्हणून इरफान खान इतका लाजाळू असायचा की तो समोर आहे हे कोणालाही समजायचे नाही. वर्गात लक्ष देत नाही म्हणून शिक्षकांकडून त्याला अनेकदा फटकारले जात असे

Irrfan Khan
Irrfan Khan

आपल्या लाजाळू स्वभावाबद्दल बोलताना इरफानने एका मुलाखतीत सांगितले "माझ्या वर्गमित्रांना हे माहित नव्हते की मी शाळेत आहे. मी अदृश्यच असायचो. माझे शिक्षक जेव्हा माझे नाव विचारायचे तेव्हा मी उभे राहून म्हणायचो पण ते ऐकू शकायचो नाही.

मला अनेकदा शिव्या घातल्या जायच्या 'मोठ्याने बोल, तुझे बोल. तुझं नाव.' मी खूप लाजाळू होतो,"पुढे तो म्हणाला, लहानपणी त्याला असे वाटले की त्याने लवकर मोठे व्हावं आहे जेणेकरून त्याला शाळेत जावे लागणार नाही.

इरफानने 155 प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा ग्रॅज्युएट असणाऱ्या, इरफानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये हसील, मकबूल, पान सिंग तोमर, हैदर, पिकू, तलवार आणि हिंदी मीडियम या भारतीय चित्रपटांचा समावेश आहे आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये द वॉरियर, द नेमसेक, अ माईटी हार्ट (एंजेलिना जोलीसह) या महत्त्वाच्या चित्रपटांचा समावेश आहे.

, Slumdog Millionaire, Life of Pi, The Lunchbox, Qissa: The Tale of a Lonely Ghost आणि The Song of Scorpions. द अमेझिंग स्पायडर मॅन, ज्युरासिक वर्ल्ड आणि इन्फर्नो या हॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे

Irrfan Khan

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरफानने आपल्या अभिनय कारकिर्दीला टेलिव्हिजनमधून सुरुवात केली. 1988 च्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या सलाम बॉम्बे चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली होती. 1990 चा काळ हा इरफानसाठी संघर्षाचा काळ होता कारण अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही त्याच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.

Irrfan Khan

2001 मध्ये, लंडन-आधारित दिग्दर्शक आसिफ कपाडिया यांनी त्यांना द वॉरियर या ब्रिटिश चित्रपटात मुख्य भूमिका दिली आणि ते लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत घरी परतलेल्या इरफानने रोग, मकबूल, हासिल, लाइफ इन ए मेट्रो आणि पान सिंग तोमर यांसारख्या चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवली

Irrfan Khan

इरफानने 2017 मध्ये धक्कादायक खुलासे केले होते की त्याला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कॉम्प्रमाईज करण्यास सांगितले होते. या काळात हार्वे वाइनस्टीन घोटाळ्याने हॉलिवूड हादरले होते, तर इरफान खान म्हणाला की बॉलीवूडमध्येही गोष्टी वेगळ्या नाहीत. नाव न घेता ते म्हणाले की, मला असे प्रस्ताव आले आहे.

Irrfan Khan

इरफानला राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. या विषयावर जेव्हा त्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले  "मी राजकारणात भविष्य शोधत नाही. मी एक कलाकार आहे आणि इथे निवडणूक जिंकण्यासाठी नाही. मी मनोरंजनासाठी काम करतो. मला जे सांगायचे आहे ते माझ्या कथा बोलतात. मी फक्त तेच विषय निवडतो जे मला महत्त्वाचे वाटतात."

Irrfan Khan

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT