दिल्लीतील मुंडका येथील मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यात 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
अनेक लोक जखमीही झाले आहेत. ज्या इमारतीला आग लागली ती 4 मजली असून तिचा वापर कंपन्यांना ऑफिस स्पेस देण्यासाठी व्यावसायिकरित्या केला जातो.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर मॅन्युफॅक्चरिंग/असेंबलिंग कंपनीचे कार्यालय असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आगीची घटना दुपारी 4 वाजता घडली, त्यानंतर आग पसरली आणि संपूर्ण इमारतीला वेढले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. 7 तास चाललेल्या या बचाव कार्यात 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेकांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे.
काल, 13 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालेल्या इमारतीमध्ये NDRF टीमने शोध आणि बचाव मोहीम राबवली.
आगीच्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले, असे बाह्य जिल्हा डीसीपी समीर शर्मा यांनी सांगितले.
या कंपनीत बहुतांश महिला कर्मचारी काम करत होत्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यावर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी वरून उड्या मारल्या.
अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी काचा फोडल्या, काही जखमींना संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
आजूबाजूची दुकाने, घरे आणि लोकांमुळे अनेकांना काही प्रमाणात वाचवण्यात यश आले, मात्र तेथे असलेले बहुतांश लोक आत अडकले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.