Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage Twitter
Image Story

दीपक-जया लग्नबंधनात अडकले, आग्रामध्ये घेतले सात फेरे, पाहा Photo

स्टेडियममध्ये केले होते दीपकने जयाला सर्वांसमोर प्रपोज

दैनिक गोमन्तक
Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहल आणि जया भारद्वाज विवाहबंधनात अडकले आहेत. बुधवारी आग्रा येथे हा विवाहसोहळा पार पडला. भव्य मिरवणुकीसह बँडबाजा घेऊन दीपकचे आगमन झाले. जयाच्या कुटुंबीयांनी दीपकचे जंगी स्वागत केले.(Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage)

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

29 वर्षीय दीपक वधूला घेण्यासाठी सजवलेल्या रथावर स्वार झाला होता. लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दीपक आणि जया यांनी एकमेकांना हार घालून लग्नाचे उर्वरित विधी पूर्ण केले. या विवाह सोहळ्यासाठी केवळ 200 ते 250 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

जाणून घ्या कोण आहे दीपक चहरची पत्नी जया

दिल्लीतील रहिवासी असलेली जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीशी संबंधित आहेत. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. इंस्टाग्रामवर, जया स्वत:चे वर्णन 'डायनॅमिक उद्योजक' आणि 'नॉन-टेक्निकल टेक्निकल' म्हणून करते.

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

जयाचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज, जो 'बिग बॉस' फेम आहे. सिद्धार्थ एमटीव्ही स्प्लिट्सविला सीझन 2 चा विजेता देखील आहे. सिद्धार्थने बहीण जयाच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करून शुभेच्छाही दिल्या.

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

दीपक चहर हा आयपीएल स्टार आहे

त्याचवेळी दीपक चहर 2016 पासून आयपीएल खेळत आहे. त्याला आयपीएलमधूनच प्रसिद्धी मिळाली. दीपकने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, पुणे सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून क्रिकेट खेळले आहे. IPL 2022 च्या मेगा लिलावादरम्यान चेन्नईला 14 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेण्यात आले. मात्र, पाठीच्या दुखापतीमुळे दीपक संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर राहिला. चेन्नई संघाने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले आणि प्ले ऑफमधून बाहेर पडला.

Deepak Chahar Jaya Bhardwaj Marriage

दीपकने टीम इंडियासाठी 7 वनडे आणि 20 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 10 आणि टी-20मध्ये 26 विकेट्स घेतल्या आहेत. दुखापतीमुळे दीपकला आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. भारतीय संघाला 9 जूनपासून आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 5 टी-20 मालिका खेळायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Protest: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT