इथिओपियाच्या अफर भागात येणारी ही जागा जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. जरी याचाएक भाग इरिट्रीयाशी मिळता जुळता आहे. येथे वितळलेला लावा खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे. तसेच संपूर्ण भागात अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. येथे दुसऱ्या ग्रहावर आल्यासारखे वाटते.
हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाण आहे. सुमारे 1,917 मीटर उंचीवर असलेल्या माऊंट वॉशिंग्टनला 327 किलोमीटर प्रती तास वारे वाहतात. तसेच येथील तापमान -40 अंशापपर्यंत खाली येते. याचा कारणामुळे लोकं येथे येण्यासाठी घाबरतात.
बोलीवियामध्ये असलेल्या मदीदी राष्ट्रीय उद्यान खूप सुंदर आहे. पण हे उद्यान खूप धोकादायक आहे. जगातील सर्वात विषारी प्राणी येथे आढळतात. तसेच या उद्यानात वाढणारी झाडे धोकादायक आहे. कारण या झाडाच्या संपर्कात आल्यास पुरळ, खाज आणि चक्कर येवू शकते. यामुळेच हे एक भयानक ठिकाण मानले जाते.
टाझानियामध्ये असलेल्या नॅट्रॉन लेक (Lake Natron) हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. असे म्हंटले जाते की या तलावाच्या पृष्ठभागावर क्षारयुक्त मिठाचा एक थर आहे. जो अतिशय धोकादायक मानला जातो. या लेकच्या संपर्कात कोणताही प्राणी आल्यास त्यांचा जीव जातो. येथे येण्यास पर्यटकांना (Tourists) सक्त मनाई केली आहे .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.