मानवी आक्रमणाच्या दुर्दैवी प्रतिमा

 

Dainik Gomantak  

Image Story

मानवी आक्रमणाच्या दुर्दैवी प्रतिमा

मॅण्डी बार्कर तिच्या छायाचित्रांच्या या प्रदर्शनात, तिने शास्त्रज्ञाबरोबर केलेल्या समुद्रसफरीत तिला समुद्राचे जे भीषण वास्तव जाणवले ते आपल्या छायाचित्रातून मांडते.

दैनिक गोमन्तक

मॅण्डी बार्करच्या छायाचित्रांचे ‘इंव्हेजन ऑफ द सिज’ हे प्रदर्शन पाहताना त्यातल्या सुंदरतेने आनंदित होऊन जावे की या छायाचित्राच्या सुंदरतेमागे असणाऱ्या मानवी नतद्रष्टतेमुळे दु:खी व्हावे या दुविधेत आपण पडतो पण जेव्हा प्रदर्शन पाहून बाहेर निघतो त्यावेळी आपण पृथ्वी या सुंदर ग्रहाची आपल्या बेपर्वा वृत्तीमुळे काय भीषण अवस्था करून ठेवली आहे याचीच खंत मनाला कुरतडत असतेच.

मॅण्डी बार्कर तिच्या छायाचित्रांच्या या प्रदर्शनात, तिने शास्त्रज्ञाबरोबर केलेल्या समुद्रसफरीत तिला समुद्राचे जे भीषण वास्तव जाणवले ते आपल्या छायाचित्रातून मांडते. हा अथांग समुद्र, जो पृथ्वीच्या तीन चतुर्थांश भागाला वेटाळून आहे, किनाऱ्यावरून कितीही सुंदर दिसला तरी तो मानवनिर्मित कचऱ्याचे आज एक आगर बनलेला आहे हेच दुर्दैवी सत्य आहे. ‘मानवी गटार’ असेच शब्द या प्रदर्शनाची क्युरेटर समुद्राला उद्देशून वापरते. स्वतः मॅण्डी बार्कर म्हणते, हे प्रदर्शन तिला आनंद देत नाही तर एक तरेची लज्जास्पद भावना तिच्या मनाला घेरून आणते.

पणजीच्या (Panji) ‘सुनापरांत आर्ट गॅलरी’त मॅण्डी बार्कर हिच्या या छायाचित्रांचे प्रदर्शन चालू आहे. प्रदर्शन चार दालनात मांडलेले आहे. पहिल्या दालनाचे नाव आहे,- ल्युनासी! मुख्य खंडापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर, पॅसिफिक महासागरात वसलेल्या ‘हेंडरसन’ या मानवरहित बेटावर दूरवरून येऊन एकत्रित झालेला प्लास्टिकचा कचरा चंद्रग्रहणाप्रमाणेच या बेटाला ग्रासून राहिला आहे असाच भास या विभागातली छायाचित्रे करून देतात.

‘इंडेफिनिट’ या दुसऱ्या दालनात, त्या बेटावर अनंत काळ साचून राहिल्यामुळे तिथल्या मानवनिर्मित कचऱ्याने जे समुद्री जीवांसारखे रूप धारण केले आहे त्याचे दर्शन मॅण्डी बार्कर घडवते. ‘पेनल्टी’ हे सूचक नाव देऊन समुद्रातून जमा केलेल्या फुटबॉलची एक अथांग रचना मॅण्डी सादर करते. हा कचरा जणू एखाद्या शिक्षेप्रमाणे मानवजातीवर पेनल्टी लादत आहे याचेच ती सूचन करते.

तिसऱ्या दालनात दाखवल्या जाणाऱ्या लघुपटाच्या प्रदर्शनातून मॅण्डी बार्करची सारी छायाचित्रे एकामागोमाग एक समोर येतात. या गॅलरीचे नाव आहे ‘ट्रॅप्ड बाय प्लास्टिक’. लघुपट समुद्री जीवांवर आणि प्रत्यक्ष समुद्रावर होणारे अत्याचार परिणामक पद्धतीने दर्शवतो. स्वतः मॅण्डी बार्कर इथे समुद्राच्या दुर्दैवी अवस्थेबद्दल आणि तिच्या प्रवासाबद्दल बोलते.

चौथ्या दालनात, ‘शेल्फ-लाइफ’मध्ये ‘हेण्डरसन’ बेटावर वेगवेगळ्या हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या वेगवेगळ्या पंचवीस देशांमधून वाहून आलेल्या कचऱ्याच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. या कचऱ्यात असणाऱ्या वस्तू कधी काळी त्या देशांमधल्या सुपर मार्केटच्या, दुकानांवरच्या किंवा घरांमधल्या शेल्फवर विराजमान होत्या.

‘सुनापरांत’च्या कलादालनात मॅण्डी बार्करच्या या सशक्त छायाचित्रांचे प्रदर्शन 23 जानेवारीपर्यंत चालणार आहे. आपल्या ग्रहाच्या सुंदरतेचा भाग असलेल्या समुद्राची आपण काय अवस्था करून ठेवली आहे याची आपल्या संवेदनशील मनाला जाणीव करून देणारे आणि भविष्यातले दुर्दैवी आक्रीत समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन पहावेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

Codar IIT Project: ‘आयआयटी आमका नाका'! कोडार ग्रामस्थ आक्रमक; सत्तरी, सांगे, केपेनंतर राज्य सरकारला मोठा झटका

Rashi Bhavishya 09 September 2025: नोकरीत उत्तम संधी मिळेल, आरोग्याची थोडी काळजी घ्या; मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा

IND vs OMA: 31 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारतीय फुटबॉल संघाचा ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच ओमानला नमवून पटकावले कांस्यपदक

Supreme Court: शिक्षा पूर्ण होऊनही 4.7 वर्षे अधिक तुरुंगात, सुप्रीम कोर्टाचा संताप; पीडिताला 25 लाखांची भरपाई देण्याचे सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT