Weekly Health Horoscope 13th October to 19th October 2025 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: सावधान! 'या' 4 राशींच्या व्यक्तींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता, वृश्चिक-मकरसाठी धोक्याची घंटा

Weekly Health Horoscope 13th October to 19th October 2025: नवा आठवडा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मेष, वृषभ, मिथुन यांच्यासह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Sameer Amunekar

नवा आठवडा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मेष, वृषभ, मिथुन यांच्यासह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग, प्रसिद्ध ज्योतिषी चिराग बेजान दारुवाला यांच्या मते जाणून घेऊया या आठवड्यात तुमचे आरोग्य कसे राहणार आहे.

मेष
मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या ऊर्जावान स्वभावासोबतच आत्म-देखभालीत संतुलन ठेवणे गरजेचे आहे. थकवा जाणवला की शरीराचे ऐकणे आणि विश्रांती घेणे विसरू नका.

वृषभ
स्वतःची काळजी घेणे आणि संतुलित जीवनशैली राखणे या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. शारीरिक तसेच मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या आणि शरीराच्या गरजा समजून घ्या.

मिथुन
या आठवड्यात स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. तुमचा उत्साही स्वभाव जास्त कामाकडे ढकलू शकतो, त्यामुळे विश्रांती आणि आत्मपरीक्षणासाठी वेळ द्या.

कर्क
या आठवड्यात आरोग्य आणि फिटनेसला सर्वोच्च प्राधान्य द्या. मनःशांती आणि आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ घालवा.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात ऊर्जा कमी करणाऱ्या क्रियांपासून दूर राहावे. आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य द्या.

कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींनी शारीरिक आणि मानसिक ताजेपणा मिळवण्यासाठी नैसर्गिक ठिकाणी वेळ घालवावा. यामुळे आरोग्य सुधारेल.

तुळ
आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती तपासा. काहींची तब्येत अचानक बिघडू शकते, त्यामुळे खबरदारी घ्या.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या भावनिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. सर्दी, ताप यांसारख्या त्रासांची शक्यता आहे.

धनु
धनु राशीच्या व्यक्तींनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्यावे. आनंद देणाऱ्या क्रियांमध्ये सहभागी व्हा.

मकर
मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. थोडीशी बेपर्वाई मोठ्या आजाराचे कारण ठरू शकते.

कुंभ
या आठवड्यात गळा आणि पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. बाहेरील तेलकट अन्न टाळा.

मीन
मीन राशीच्या व्यक्तींनी आत्म-देखभालीवर भर द्यावा. शरीर आणि मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

Sattari Accident: होंडा सत्तरी रिक्षा आनी दुचाकीमदी भिरांकुळ अपघात; एकल्याक मरण

Rama Kankonkar: "रामाच्या तोंणान ही उतरां घातली कोणें?", 23 दिवस शांत, मग अचानक काय झालं? आरोपांवर खवंटेंचा पलटवार

SCROLL FOR NEXT