गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

Goa Police: गोवा पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक कारवाईमुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: बागा (Baga) येथे रस्त्यावर हरवलेले 4 लाख 50 हजार रुपये (Rs. 4,50,000) किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गोवा पोलिसांनी तातडीने शोधून संबंधित महिला पर्यटकाला परत केले. गोवा पोलिसांच्या या तत्पर आणि प्रामाणिक कारवाईमुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

नेमकी घटना

बेळगाव येथील एक महिला (Women) पर्यटक बागा पोलीस ठाण्यात आली. तिने तक्रार दिली की, तिचे सोन्याचे मंगळसूत्र बागा येथील रस्त्यावर कुठे तरी पडले आणि ते हरवले. मंगळसूत्राची मोठी किंमत असल्याने या महिलेने पोलिसांना तातडीने मदत करण्याची विनंती केली.

Goa Police
Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

पोलिसांची तातडीची कारवाई

तक्रार मिळताच बागा पोलिसांनी त्वरीत कारवाई सुरु केली. पोलीस उपनिरीक्षक (PSI) योगेश यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरु केली. या पथकाने परिसरात कसून चौकशी केली आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच हरवलेले मंगळसूत्र त्यांना सापडले.

Goa Police
Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

मंगळसूत्र मालकाकडे सुपूर्द

सोने मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळसूत्राची पडताळणी केली. त्यानंतर ते कायदेशीर मालक असलेल्या बेळगावच्या पर्यटकांना सन्मानाने परत केले. गोवा पोलिसांच्या (Goa Police) या कार्यक्षमतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे त्या पर्यटकांनी आभार व्यक्त केले. पर्यटकांची सुरक्षा आणि हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यात गोवा पोलीस किती तत्पर आहेत, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com