Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

aditya jambhale filmfare award: समीक्षकांकडून प्रशंसित झालेल्या Article 370 या चित्रपटासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
filmfare awards 2025
filmfare awards 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: गोव्याचे सुपुत्र आदित्य सुहास जांभळे यांनी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि समीक्षकांकडून प्रशंसित झालेल्या 'आर्टिकल ३७०' (Article 370) या चित्रपटासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' (Best Debut Director) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आदित्य जांभळे हे फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे गोव्यातील पहिले व्यक्ती ठरले आहेत, ज्यामुळे गोव्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरलाय. त्यांच्या चित्रपटाला केवळ समीक्षकांकडूनच नाही, तर व्यावसायिक दृष्ट्याही प्रचंड यश मिळाले आहे. चित्रपटाची मजबूत कथा आणि प्रभावी सादरीकरणामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आदित्य जांभळे यांचे अभिनंदन

आदित्य जांभळे यांच्या या ऐतिहासिक यशानंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे की, "आदित्य सुहास जांभळे यांना 'आर्टिकल ३७०' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! हा गोव्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे, कारण फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे ते पहिले गोमंतकीय ठरलेत. हे यश आपल्या राज्यातून उदयास येत असलेल्या सर्जनशीलतेचे आणि प्रतिभेचे दर्शन घडवते."

filmfare awards 2025
Aditya Jambhale At IFFI: '..मौजमजा म्‍हणजे गोवा नव्‍हे'; Article 370 च्या दिग्दर्शकाची गोमंतकीय चित्रपटसृष्टी, पर्यटनाबद्दलची परखड मते वाचा

डॉ. सावंत यांनी पुढे नमूद केले की, "त्यांची ही कामगिरी सिनेमा आणि कथाकथनाच्या जगात आपले स्थान निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येक तरुण गोमंतकीयासाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!" या पुरस्कारामुळे गोव्यातील तरुण कलाकारांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे, यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com