Weekly Finance Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Weekly Finance Horoscope: आर्थिक धोक्याची घंटा! 'या' 3 राशींच्या लोकांसाठी 'हा' आठवडा ठरणार 'अग्निपरीक्षा, सावध राहा

Weekly Finance Horoscope 2nd March to 8th March 2026: नवीन आठवडा सुरू होत असताना ग्रहमानाची स्थिती बदलणार आहे.

Sameer Amunekar

नवीन आठवडा सुरू होत असताना ग्रहमानाची स्थिती बदलणार आहे. या काळात कर्क, कन्या आणि मकर या तीन राशींच्या जातकांनी पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमची एक छोटीशी चूक मोठ्या आर्थिक नुकसानीला कारणीभूत ठरू शकते. दुसरीकडे, मेष आणि मिथुन राशीसाठी गुंतवणुकीचे सुवर्णयोग जुळून येत आहेत.

मेष, वृषभ आणि मिथुन: गुंतवणुकीसाठी उत्तम काळ

मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या बचतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, तरच भविष्यात आर्थिक स्थिरता लाभेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात फायदेशीर योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क, कन्या आणि मकर राशींनी राहावे सतर्क

कर्क राशीच्या लोकांना जुन्या कामातून लाभ होईल, परंतु आर्थिक व्यवहारात थोडाही बेजबाबदारपणा महागात पडू शकतो. कन्या राशीच्या जातकांनी या आठवड्यात कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीत पैसे अडकवू नयेत, अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल. मकर राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना केवळ विश्वासू व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय घ्यावेत, फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

सिंह, तुळ आणि वृश्चिक: बजेटचे नियोजन आवश्यक

सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सामान्य असेल, परंतु कुटुंबातील वाढत्या खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. तुळ राशीसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी शुभ असून जुन्या कामातून धनलाभ होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपली कमाई वाचवण्यावर भर द्यावा, कारण सध्या केलेली गुंतवणूक जोखीमपूर्ण ठरू शकते.

धनु, कुंभ आणि मीन: चढ-उताराचा काळ

धनु राशीची आर्थिक स्थिती सध्या अस्थिर असेल, त्यामुळे बचतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय तुमच्याकडे नाही. याउलट कुंभ राशीच्या लोकांसाठी जोखमीची गुंतवणूक देखील फायदेशीर ठरेल आणि चांगले रिटर्न्स मिळतील. मीन राशीच्या लोकांनी जरी तुमच्याकडे पुरेशी बचत असली, तरी नवीन खर्च टाळावेत, कारण नशीब सध्या तुमच्या बाजूने नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT