शुक्र ग्रहाचे ज्योतिषशास्त्रातील विशेष महत्त्व
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्याच्या कुंडलीत हा ग्रह शुभ स्थानी असतो, त्याचे भाग्य उजळते. एखाद्याला जीवनात किती धन-संपत्ती मिळेल, हे बऱ्याच अंशी शुक्र ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असते. शुक्र ग्रह साधारणतः प्रत्येक २३ ते २६ दिवसांनी राशी बदलतो. त्यामुळे हा ग्रह एका वर्षात १२ ते १५ वेळा राशी परिवर्तन करतो.
२० ऑगस्ट रोजी शुक्र मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे चार राशींच्या व्यक्तींना कठीण दिवसांना सामोरे जावे लागणार आहे. पाहूया कोणत्या आहेत त्या राशी –
शुक्र ग्रहाच्या बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नको असतानाही प्रवास करावा लागेल, ज्यात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात. संतानामुळे वाद उद्भवू शकतो. आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात तणाव वाढू शकतो.
या राशीच्या लोकांना व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात फसवणूक होऊ शकते. ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला जाईल, तेच धोका देऊ शकतात. इतरांच्या कामात हस्तक्षेप टाळावा, अन्यथा संकट येऊ शकते. कोर्ट-कचेर्याचे कामे अडकू शकतात, पोलिस ठाण्यातील फेऱ्याही माराव्या लागू शकतात. पैशांची तंगी राहण्याची शक्यता आहे.
धनु राशीच्या लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्या विरोधात कट रचला जाऊ शकतो आणि त्यात कुटुंबातीलच काही जण सामील असण्याची शक्यता आहे. सासरकडून वाईट बातमी मिळू शकते. अचानक प्रवास करावा लागू शकतो. पत्नीसोबत वाद होऊ शकतो. जुगार, सट्टा यात पैसे लावल्यास नुकसान होईल.
या राशीच्या लोकांना दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागेल. कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीच्या दूर जाण्यामुळे ते नैराश्यात जाऊ शकतात. पैशावरून वाद होण्याची शक्यता आहे. नको असतानाही कर्ज घ्यावे लागेल. हातातील कामांमध्ये अपयश येऊ शकते.
या लेखातील माहिती धर्मग्रंथ, विद्वान व ज्योतिष यांच्या आधारे दिलेली आहे. आम्ही केवळ ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवित आहोत. युजर्सनी याला फक्त माहिती म्हणूनच घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.