Lucky Gemstones For Career: आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्तीला करिअर आणि व्यवसायात यशाची सर्वोच्च शिखरे गाठायची आहेत. कठोर परिश्रम, कौशल्य आणि योग्य संधी यांसोबतच जर ग्रहांची साथ मिळाली, तर यशाचा मार्ग अधिक सुकर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, रत्ने ही ग्रहांची शक्ती वाढवण्याचे एक प्रभावी माध्यम आहेत. योग्य रत्न आणि योग्य विधीने ते धारण केल्यास नोकरी, व्यवसाय आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सकारात्मक बदल घडवून आणता येतात. चला तर मग आज अशा 5 प्रभावी रत्नांविषयी जाणून घेऊया, जी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकतात.
पाचू हे बुध ग्रहाचे रत्न मानले जाते. ज्योतिष शास्त्रात बुध हा बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक ग्रह आहे. पाचू धारण केल्यामुळे निर्णयक्षमता वाढते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. ज्यांना नोकरीमध्ये पदोन्नती हवी आहे किंवा जे स्वतःचा व्यापार करतात, त्यांच्यासाठी पाचू अत्यंत लाभदायक ठरतो. हे रत्न चांदी किंवा सोन्यात मढवून करंगळीमध्ये धारण करण्याची पद्धत आहे.
मूंगा हे मंगळ ग्रहाशी संबंधित रत्न आहे. हे रत्न आत्मविश्वास आणि साहस वाढवण्यासाठी ओळखले जाते. जे लोक व्यवस्थापन (Management) किंवा नेतृत्व करणाऱ्या पदांवर काम करत आहेत, त्यांच्यासाठी गोमेद अतिशय उपयुक्त ठरते. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मंगळ ग्रहाचे हे रत्न अनामिका बोटात घालण्याचा सल्ला दिला जातो.
गोमेद हे राहु ग्रहाचे रत्न आहे. राहु जर कुंडलीत शुभ स्थितीत असेल, तर गोमेद धारण केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि कामात एकाग्रता वाढते. विशेषतः शेअर बाजार, आयटी क्षेत्रातील लोकांसाठी गोमेद फायदेशीर मानले जाते. हे अचानक होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करते. हे रत्न सामान्यतः चांदीच्या अंगठीत धारण केले जाते.
नीलम हे शनी ग्रहाचे अत्यंत प्रभावी रत्न मानले जाते. शनी हा कर्माचा देवता आहे, त्यामुळे नीलम परिधान केल्याने कामात शिस्त येते आणि केलेल्या कष्टाचे पूर्ण फळ मिळते. ज्यांना उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायचे आहेत किंवा करिअरमध्ये स्थिरता हवी आहे, त्यांनी नीलम हे रत्न धारण करावे. हे रत्न मधल्या बोटात (Middle Finger) शनिवारी धारण केले जाते. मात्र, नीलम धारण करण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
जेड रत्न करिअर आणि व्यापारामध्ये संतुलन राखण्यास मदत करते. हे रत्न शांतता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जेड परिधान केल्याने व्यक्तीची निर्णयक्षमता सुधारते. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी जेड रत्न अंगठी किंवा पेंडंटच्या स्वरुपात वापरले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.