Horoscope Today Dainik Gomantak
Horoscope

Horoscope Today: होळीला 'या' 3 राशींवर होणार धनलक्ष्मीचा वर्षाव; पदरात पडणार फक्त पुण्य

Horoscope Today March 2, 2026: आज फाल्गुन शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून सोमवारचा दिवस आहे.

Sameer Amunekar

आज फाल्गुन शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून सोमवारचा दिवस आहे. आजचा दिवस अध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आज देशभरात 'होळी पौर्णिमा' आणि 'होळिका दहन' साजरे केले जाणार आहे. जरी आज पृथ्वीलोकावर अशुभ भद्रा असली, तरी ग्रहांच्या स्थितीनुसार अनेक राशींसाठी हा काळ प्रगतीचा ठरणार आहे.

आर्थिक भरभराटीचा काळ

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. दुसरीकडे, वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरणार आहे. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील आणि एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे नवीन संधी उपलब्ध होतील.

शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती

मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाईल. सिंह राशीच्या नोकरी शोधणाऱ्या तरुणांना ओळखीच्या व्यक्तीमार्फत रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांनी कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे.

नातेसंबंध आणि सामाजिक जीवन

कर्क राशीच्या व्यक्तींना आज जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तर मिथुन राशीचे लोक नवीन घर घेण्याबाबत कुटुंबाशी चर्चा करतील. तूळ राशीचे लोक आज घराच्या सजावटीत व्यस्त राहतील. वृश्चिक राशीच्या जातकांना भावंडांकडून मोलाचा सल्ला मिळेल, जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

मानसिक शांती आणि आरोग्य

धनु राशीच्या लोकांनी आज स्वतःच्या स्वभाववर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. कुंभ राशीच्या लोकांनी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल. मीन राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. आज भद्रा काळ असल्याने कोणताही मोठा निर्णय घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT