Surya Gochar Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

Horoscope: १७ ऑक्टोबर रोजी सूर्य आपल्या अनुकूल कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Sameer Amunekar

१७ ऑक्टोबर रोजी सूर्य आपल्या अनुकूल कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे वायू तत्वाच्या राशीतील संक्रमण काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकते. या काळात काहींना करिअर, कौटुंबिक जीवन आणि आर्थिक क्षेत्रात चढ-उतारांचा अनुभव येईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर या संक्रमणाचा परिणाम होणार आहे आणि त्यावर कोणते उपाय करावेत.

कर्क
सूर्य तुमच्या राशीच्या चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. हा भाव कौटुंबिक जीवन आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित असल्याने या काळात घरगुती वातावरणात थोडीशी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पालकांशी किरकोळ वाद, आर्थिक बाबींमध्ये ताणतणाव जाणवू शकतो.

साठवलेली संपत्ती खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात अनावश्यक वाद टाळा, कारण गैरसमजांमुळे प्रतिमा धोक्यात येऊ शकते. आरोग्याची, विशेषतः हृदयाशी संबंधित बाबींची काळजी घ्या. उपाय म्हणून दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य मंत्रांचा जप करा.

वृश्चिक
सूर्य तुमच्या बाराव्या भावात म्हणजेच खर्च आणि परदेश प्रवासाशी संबंधित स्थानी प्रवेश करणार आहे. या काळात खर्च वाढण्याची शक्यता आहे. नकळत अनेक गोष्टींवर पैसे खर्च होतील. आरोग्य, विशेषतः डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

संयम ठेवा, अन्यथा सोशल मीडियावर तुमची प्रतिमा बिघडू शकते. परिश्रम असूनही अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा येऊ शकते, मात्र संयम बाळगा. उपाय म्हणून आदित्य हृदय स्तोत्राचे नियमित पठण करा.

मीन
सूर्य तुमच्या आठव्या भावात भ्रमण करेल, जो ताण, संकटे आणि अचानक घडणाऱ्या घटनांशी संबंधित आहे. या काळात भविष्याबद्दल चिंता न करता आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. काहीजण नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात, पण सल्ल्याशिवाय निर्णय घेणे टाळा.

आर्थिक बाबींमध्ये निष्काळजीपणा नुकसानदायक ठरू शकतो. गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. उपाय म्हणून सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पुरे झाली आता आश्‍‍वासने; भंगारअड्ड्यांसाठी धोरण ठरवा - संपादकीय

Dhargal: धारगळच्या आयुर्वेद संस्थेची सेवा, शिक्षण, संशोधन क्षेत्रात झेप; 5.25 लाखांहून अधिक रुग्णसेवा, 40 हजार आरोग्य शिबिरे

Goa Winter Update: राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी, पारा घसरला 17.5 अंशांवर

Verna: व्‍यावसायिक वादातून भंगारअड्ड्याला आग, बेकायदा आस्‍थापनांना अभय का? केळशी परिसरात धुराचा प्रचंड त्रास

Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

SCROLL FOR NEXT