Surya Gochar 2025 Dainik Gomantak
Horoscope

Surya Gochar 2025: 3 ऑगस्टपासून चमकणार नशीब! 'या' राशींच्या लोकांना मिळणार मान, सन्मान आणि नव्या नोकरीची संधी

Surya Gochar : सध्या सूर्य कर्क राशीत भ्रमण करत आहे. सूर्य देव लवकरच आपले नक्षत्र बदलून ३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४:१६ वाजता आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Sameer Amunekar

सध्या सूर्य कर्क राशीत भ्रमण करत आहे. सूर्य देव लवकरच आपले नक्षत्र बदलून ३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४:१६ वाजता आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आश्लेषा हे बुध ग्रहाचे नक्षत्र असल्याने सूर्य आणि बुध यांच्यातील मैत्रीचा लाभ काही राशींना विशेष मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती, नोकरीच्या नव्या संधी, मान-सन्मान आणि आर्थिक लाभ या राशींना मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया अशा भाग्यवान ३ राशी कोणत्या आहेत त्या.

तुळ (Libra)

तुळ राशीच्या व्यक्तींना ३ ऑगस्टपासून सुरू होणारा सूर्याचा नक्षत्र बदल अत्यंत शुभ फल देणारा ठरणार आहे. करिअरच्या क्षेत्रात पदोन्नतीच्या किंवा नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील. आर्थिक दृष्टीनेही हा काळ लाभदायक ठरेल. सरकारी अधिकारी, राजकीय व्यक्ती किंवा वरिष्ठांशी संबंध अधिक दृढ होतील.

अविवाहित लोकांना चांगल्या स्थळांपासून लग्नाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल, नव्या ग्राहकांची वाढ आणि भागीदारीचे नवे संकेत मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक एकाग्रता लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक (Scorpio)

सूर्याच्या नक्षत्र बदलामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश, मान्यता आणि पदोन्नतीचे योग येणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील, ज्यामुळे उच्च पद मिळण्याची संधी असेल.

व्यवसायात नफा, नवीन व्यवहार किंवा मागील गुंतवणुकीतून परतावा मिळू शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना यशाचे संकेत मिळतील. प्रवासाचे योग निर्माण होतील, जे प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढवणारे ठरतील. आर्थिक तणाव कमी होऊन मन:शांती मिळेल.

मीन (Pisces)

मीन राशीसाठी हा काळ सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत लाभदायक आहे. समाजात मान, प्रतिष्ठा आणि चांगली ओळख निर्माण होईल. तुम्ही जे प्रयत्न करत होता, त्याला योग्य फळ मिळेल आणि करिअरमध्ये स्पष्ट प्रगती दिसून येईल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध सौख्यपूर्ण राहतील.

मुलांकडून एखादी आनंददायक बातमी मिळू शकते. आर्थिक बाजू बळकट होईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होईल. तसेच, जुन्या तणावांना विराम मिळून नवे संबंध अधिक बळकट होतील.

वरील तीन राशींसाठी ३ ऑगस्टपासूनचा काळ अत्यंत शुभ आहे. सूर्याच्या आश्लेषा नक्षत्रातील प्रवेशामुळे या राशींना यश, आर्थिक स्थैर्य, आणि सामाजिक मान्यता मिळू शकते. योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ही संधी आयुष्यातील एक नवा आणि सकारात्मक वळण ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: पहिला विजय झाला, आता मालिका विजयाची 'हुकमी तयारी'! दुसरा सामन्याचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर वाचा

Haryana Crime: तोकडे कपडे आणि चारित्र्यावर संशय... 18 वर्षीय भावाने बहिणीची बॅटने मारहाण करुन केली हत्या; हरियाणातील संतापजनक घटना!

Formula 4 Racing In Goa: गोव्यात होणार प्रतिष्ठीत 'फॉर्म्युला- 4 रेस'; गोमंतकीयांना अनुभवता येणार जागतिक रेसिंग स्पर्धेचा थरार

टीसींना 'बॉडी कॅमेऱ्यांचे' कवच! खोट्या विनयभंगाचे आरोप रोखण्यासाठी होतेय मागणी, तिकीट नसताना टीसीशी हुज्जत घालणाऱ्या महिलेचा Video Viral

Goa Congress: 'भाजप का काँग्रेसविरोधात लढायचंय ठरवा'; भूमिका स्पष्ट करण्याचा माणिकराव ठाकरेंचा 'आप'ला सल्ला

SCROLL FOR NEXT