

वाळपई : राज्यात बेकायदेशीर गोमांस जप्त करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना वाळपई पोलिसांनी केरी तपासणी नाक्यावर ७५० किलो बेकायदेशीर गोमांस जप्त केले आहे. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आले. तसेच कर्नाटकातील चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
बेळगावहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या कर्नाटकच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनाची केरीत करण्यात आली. या वाहनातून भाजी वाहतुकीच्या नावाखाली गोमांसाची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वाहनात सुमारे ७५० किलो लाल रंगाचे मांस आढळून आले.
अंदाजे २ लाख १० हजार रुपयांच्या किंमतीचे हे गोमांस अस्वच्छ अवस्थेत तसेच कोणतेही बिल अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना वाहतूक केले जात असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वाहन चालक सादिक बी. नायकवडी (वय ३३), रा. घर क्र. २७८, अंकलगी, बेळगाव (कर्नाटक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.१७ वाजता वाळपई पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. १२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच गोवा अॅनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट १९९५ च्या कलम ८ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
ही तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अंकुश कृष्णा गावकर (वय ३४), बकल क्रमांक ८१५१, वाळपई पोलिस ठाण्यात कार्यरत यांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचा पंचनामा वाळपई येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आला असून त्याची पुढील विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वाळपई पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक सानिशा नाईक करत आहेत.
बेळगाव मार्गावरून मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक होत असल्याच्या घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे पकडण्यात आलेली काही वाहने काही दिवसांनंतर पुन्हा अशाच प्रकारच्या वाहतुकीसाठी वापरली जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.