Goa Fishing: ट्रॉलरमालकच करतात बेकायदा मासेमारी! पारंपरिक मच्छीमारांचे आरोप; वाद चिघळण्याची शक्यता

Fishing season Goa: सात दिवसांपूर्वी ट्रॉलर मालकांनी मासेमारी बंदी सर्वांना लागू करावी व पारंपरिक मच्छिमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याचा आरोप केला होता.
fishing season Goa tensions
Goa fishingDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: यंदाचा मासेमारी मोसम सुरू व्हायला आणखी दहा दिवस असताना पारंपरिक मच्छीमार व ट्रॉलर मालक यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सात दिवसांपूर्वी ट्रॉलर मालकांनी मासेमारी बंदी सर्वांना लागू करावी व पारंपरिक मच्छिमार बेकायदेशीररित्या मासेमारी करीत असल्याचा आरोप केला होता व तशी तक्रार पण मत्स्योद्योग खात्याकडे केली होती. या संदर्भात शनिवारी सासष्टी व मुरगाव तालुक्यांतील पारंपरिक मच्छिमार कोलवा समुद्र किनाऱ्यावर एकवटले व त्यांनी ट्रॉलर मालक दिशाभूल करीत आहेत व तेच बेकायदेशीर मासेमारीत गुंतले आहेत, असा दावा केला.

जुलैमध्ये पारंपरिक मच्छिमारांना मासेमारी करणे हे कायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. मत्स्योद्योग खातेही पारंपरिक मच्छिमारांना डावलून ट्रॉलरवाल्यांच्या भल्याचाच विचार करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला. जुलै महिन्यात मासेमारी करणे हा आमचा पारंपरिक अधिकार आहे. ट्रॉलर मालक ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिनाचा वापर करतात, एलईडीचा वापर करतात. मत्स्योद्योग खाते आमचे म्हणणे ऐकून घेत नाही तर ट्रॉलर मालकांना मदत करते, असे दुमिंग रॉड्रिग्ज याने सांगितले.

ट्रॉलरवाले जी मासळी पकडतात त्यातील ९० टक्के मासळी इतर राज्यांमध्ये निर्यात केली जाते. तर पारंपरिक मच्छिमार केवळ गोमंतकीयांची भूक भागवतात, असे यावेळी सांगण्यात आले.

पेले फर्नांडिस, जुझे फर्नांडिस, दुमिंग रॉड्रिग्ज, एलिस्टन पिंटो यांनी पारंपरिक मच्छिमारांच्या निषेधामागची कारणे स्पष्ट केली.

fishing season Goa tensions
Goa Fishing: '..भविष्यात मासेच संपतील'!पारंपरिक मच्छिमारांकडून मासेमारी बंदीचे उल्लंघन; ट्रॉलरमालकांची कारवाईची मागणी

समुद्र किनाऱ्यावरील पोलिसांना त्वरित हटवावे. ते पारंपरिक मच्छिमारांना मासेमारीपासून अडवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

उच्च व सर्वोच्च या दोन्ही न्यायालयांनी एलईडीचा वापर करण्यास बंदी टाकलेली आहे. तरी मत्स्योद्योग खाते काहीही कारवाई करीत नाही. मासेमारीसाठी इतर राज्यातून बोटी गोव्याच्या समुद्रात येतात त्यांचा पाठलाग करून त्यांना परतवण्याचे काम पारंपरिक मच्छिमार करतात. ट्रॉलरवाले केवळ बघ्याची भूमिका घेतात, असेही पारंपरिक मच्छिमारांनी सांगितले.

fishing season Goa tensions
Rapan Fishing: रापण ओढा रे! शेकडो वर्षांपासून उधाणलेला समुद्र, ढगाळ आकाशाखाली होणारी पारंपरिक मासेमारी पद्धत

मच्छिमारांची नव्या मोसमासाठी तयारी

यंदाच्या मासळी मोसम सुरू व्हायला केवळ सात दिवस बाकी असताना बाणावलीतील पारंपरिक मच्छिमारांनी नव्या मोसमासाठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर ठेवल्या होत्या त्या आता समुद्र किनाऱ्यालगत नेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर त्यांची दुरुस्ती व देखरेखीचे काम हातात घेतले जाईल. मात्र तिथे लोडिंग रॅम्प नसल्याने मच्छिमारांची धांदल उडत आहे. त्यामुळे मच्छिमार लोडिंग रॅम्पची मागणी करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com