Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Goa Latest News: कोलवा बीचवर गोवा पोलिसांनी दोन हजार रुपये लाच घेतल्याचा गंभीर आरोप एका व्यक्तीने केला आहे.
Bribe Case - Goa Police
Colva - Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांनी मला भीती दाखवून दोन हजार रुपये लाच घेतल्याचा गंभीर आरोप एका व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीने एक्सवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह गोवा पोलिस आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केले आहे. या व्यक्तीच्या आरोपामुळे गोवा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सिंघल सौरभ या व्यक्तीने याबाबत एक्सवरुन एक पोस्ट केली आहे. गोवा पोलिस सर्वात खराब आहेत. गोवा पोलिसांच्या गाडीतून आलेल्या दोन पोलिसांनी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर माला भीती दाखवून दोन हजार रुपये लाच घेतली, असा आरोप सौरभ या व्यक्तीने केला आहे.

Bribe Case - Goa Police
'म्हादई आमची लढाई, आमचे आम्हाला मिळत नाही तोवर विश्रांती नाही'; प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यानंतर DK शिवकुमारांचा इशारा

सौरभ या व्यक्तीने या आरोपासह राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत, गोवा पोलिस, प्रधानमंत्री कार्यालय, पर्यटन विभागाला टॅग केले आहे. २३ जुलै रोजी सौरभने ही पोस्ट केली आहे.

X - Post
X - PostDainik Gomantak
Bribe Case - Goa Police
भूमिका देवस्थान वाद पुन्हा चिघळला! दगडफेक प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठी वाळपई पोलीस ठाण्याबाहेर ग्रामस्थांची तोबा गर्दी

गोवा पोलिसांनी सौरभच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणाची दखल घेतली असून, प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. दोषी अढळल्यास दोघांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे उत्तर दक्षिण गोवा पोलिसांनी या व्यक्तीला दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com