Surya Nakshatra Gochar Dainik Gomantak
Horoscope

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

Surya Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो.

Manish Jadhav

Surya Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. द्रिक पंचांगानुसार, 15 मार्च रोजी सूर्याने मीन राशीत प्रवेश केला असून या घटनेला 'मीन संक्रांती' म्हटले जाते. सूर्य आता पुढील एक महिना याच राशीत विराजमान राहणार असून त्यानंतर एप्रिलमध्ये तो मेष राशीत प्रवेश करेल. मात्र, या मीन राशीतील प्रवासादरम्यान 18 मार्च 2026 रोजी सूर्य एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे.

ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, सूर्य आता शनिच्या मालकीच्या 'उत्तराभाद्रपद' नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याचे शनिच्या नक्षत्रात जाणे हे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत विशेष मानले जाते, कारण सूर्य आणि शनि यांच्यातील हा संयोग काही विशिष्ट राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरु शकतो.

सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनामुळे प्रामुख्याने मेष राशीच्या जातकांसाठी सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता आहे. शनिच्या नक्षत्रातील सूर्याचे वास्तव्य मेष राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवून देऊ शकते. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून जी मेहनत करत आहात, तिची दखल आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. बराच काळ रखडलेली कामे आता मार्गी लागतील आणि आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा दिसून येईल.

उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची बचत वाढण्यास मदत होईल. व्यापारी वर्गासाठी नवीन लोकांशी होणारे संपर्क भविष्यात फायदेशीर ठरु शकतात, फक्त या काळात संयम आणि शिस्त पाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल.

दुसरीकडे, मिथुन राशीच्या लोकांसाठी हे गोचर करिअरमध्ये मोठी भरभराट घेऊन येणारे ठरेल. जे लोक नोकरीत आहेत, त्यांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची कामाप्रती असलेली निष्ठा तुम्हाला ऑफिसमध्ये (Office) एक वेगळी ओळख मिळवून देईल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. जे स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना एखाद्या नवीन भागीदारीतून किंवा योजनेतून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थैर्यासोबतच कौटुंबिक जीवनातही आनंदाचे वातावरण राहील आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल.

तसेच, मकर राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन भाग्याची साथ देणारे ठरेल. मकर राशीचा स्वामी स्वतः शनिदेव असल्याने सूर्याचे त्यांच्या नक्षत्रात येणे या राशीसाठी विशेष फलदायी आहे. तुमच्या नियोजित योजना आता यशस्वी होताना दिसतील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायात सावकाश पण शाश्वत प्रगतीचे संकेत मिळत आहेत. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात तुम्हाला यश मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा उंचावेल, ज्यामुळे नवीन संधींची दारे उघडतील. एकूणच, सूर्याचे हे उत्तराभाद्रपद नक्षत्रातील भ्रमण या तीन राशींसाठी समृद्धी आणि प्रगतीची नवी दिशा दाखवणारे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT