

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी-अमावस्या आणि सोमवार यांचा संगम १६ फेब्रुवारी २०२६ ला विशेष धार्मिक महत्त्व देतो. या दिवशी वरीयान, परिघ, सर्वार्थ सिद्धी आणि आडल योग जुळत असून चंद्राची स्थिती सर्व राशींवर सूक्ष्म परिणाम करणार आहे. ग्रहबदल नसला तरी योगांचे प्रभाव जीवनात सकारात्मक किंवा सावधगिरीचे संकेत देतात.
मेष: दिवस चढ-उताराचा. आरोग्य आणि व्यवसायात तणाव. कुटुंबात वाद टाळा.
वृषभ: तब्येत ढासळू शकते. नवीन गुंतवणूक टाळा. भावंडांशी मतभेद संभवतात.
मिथुन: प्रलंबित काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत; धार्मिक प्रवासाचा योग.
कर्क: शुभ भेटीगाठी. नवीन भागीदारी लाभदायक. मान-सन्मान वाढेल.
सिंह: नोकरीत यश. व्यवसायात नवे प्रस्ताव. मित्रांकडून आर्थिक मदत.
कन्या: नियोजित कामे पूर्ण. आरोग्य सुधारेल. कुटुंबात मंगलकार्याची शक्यता.
तूळ: नोकरीच्या प्रयत्नांना यश. आरोग्याची काळजी घ्या. नव्या उपक्रमास प्रारंभ.
वृश्चिक: आरोग्य ढासळू शकते; खर्च वाढू शकतो. कार्यक्षेत्रात बदल टाळा.
धनु: कटकारस्थानापासून सावध राहा. आर्थिक हानीची शक्यता. वाहन चालविताना खबरदारी.
मकर: वाहन खरेदीचा योग. पदोन्नतीची शक्यता. कुटुंबात आनंदाचे वातावरण.
कुंभ: शुभ वार्ता. कुटुंबात मंगलकार्य. मित्रांचे आर्थिक सहकार्य लाभेल.
मीन: सासरकडून मदत. न्यायालयीन प्रकरणात यश. नव्या योजनांना सुरुवात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.