Navpancham Drishti 2026 Dainik Gomantak
Horoscope

Navpancham Drishti 2026: 7 ऑगस्टला आकाशात ग्रहांचे महायुद्ध! सूर्य-शनीची 'नवपंचम दृष्टी' 5 राशींवर आणणार मोठं महासंकट

Sun Saturn Navpancham Yoga 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या बदलत्या स्थितीला आणि त्यांच्या परस्पर दृष्टीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

Manish Jadhav

Sun Saturn Navpancham Yoga 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या बदलत्या स्थितीला आणि त्यांच्या परस्पर दृष्टीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे वेळोवेळी शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात, ज्याचा थेट प्रभाव मानवी जीवनावर पडतो. द्रिक पंचांगानुसार, येत्या 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी सूर्य आणि शनी ग्रह एकमेकांपासून 120 अंशांवर येणार आहेत. या विशेष स्थितीमुळे 'नवपंचम दृष्टी' योग तयार होत आहे. हा योग सर्वच राशींसाठी फायदेशीर ठरणार नाही.

विशेषतः 5 राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि त्रासाचा ठरु शकतो, ज्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे. व्यापार किंवा नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका; अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये अजिबात निष्काळजीपणा दाखवू नका, नाहीतर नवीन अडचणी उभ्या राहतील. या काळात मानसिक तणावामुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा वेळ कठीण असेल. अभ्यासात मन न लागल्याने अपयश येऊ शकते आणि पालकांकडून ओरडा खावा लागू शकतो. व्यवसायात अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे व्यावसायिक चिंता वाढेल आणि घरातील सुख-शांती लोप पावू शकते.

सिंह राशीच्या जातकांना या काळात नशिबाची साथ मिळणार नाही. व्यवसायाची गती मंदावल्याने मानसिक ताण वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील खालावू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य न मिळाल्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल आणि स्वतःला एकटे समजू लागाल. धनु राशीच्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून टीकेला सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचे मन विचलित होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याविषयी किंवा इतर समस्यांविषयीच्या चिंता कमी होणार नाहीत.

तसेच, स्वतःच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष केल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा वाढणे निश्चित आहे. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संघर्षाचा असेल. तुमच्या मुलांना प्रत्येक छोटी गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील. वेळेचा योग्य सदुपयोग न केल्यामुळे तुमची महत्त्वाची आणि ठरलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. परिणामी, घरात विनाकारण वादविवाद आणि क्लेश निर्माण होऊन वातावरण तणावपूर्ण राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT