Shukra Rahu Yuti 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shukra Rahu Yuti 2026: फेब्रुवारीत नशिबाची साथ! शुक्र-राहूच्या युतीने 'या' 3 राशी होणार मालामाल, अडकलेली कामं पूर्ण होणार

Shukra Rahu Yuti 2026 Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असतात.

Sameer Amunekar

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्रहांच्या गोचरामुळे एक अत्यंत महत्त्वाचा योग जुळून येत आहे. ऐश्वर्य, सुख आणि संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, कुंभ राशीत आधीच राहू विराजमान असल्याने या ठिकाणी 'शुक्र-राहू'ची युती होणार आहे. ही युती काही राशींच्या व्यक्तींसाठी 'राजयोग' ठरण्याची शक्यता असून, त्यांच्या करियर आणि व्यापारात मोठी प्रगती होईल.

कधी होणार शुक्र गोचर?

द्रिक पंचांगानुसार, शुक्र ग्रह ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुक्रवारी रात्री १ वाजून १५ मिनिटांनी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशी परिवर्तनामुळे निर्माण होणारी शुक्र-राहूची युती आर्थिक आणि भौतिक सुख-सोयींमध्ये वाढ करणारी ठरेल.

या ३ राशींचे नशीब उजळणार:

१. मेष रास (Aries): मेष राशीच्या व्यक्तींच्या 'उत्पन्न' (आय) स्थानी ही युती होत आहे. यामुळे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. जे लोक व्यापारात आहेत, त्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. विशेषतः शिक्षण आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना या काळात मोठे यश आणि पदोन्नती मिळण्याचे योग आहेत.

२. वृश्चिक रास (Scorpio): वृश्चिक राशीसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नसेल. तुमच्या सुख-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. रिअल इस्टेट, जमीन व्यवहार आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या युतीचा मोठा फायदा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक अडचणी दूर होऊन आयुष्यात स्थैर्य येईल.

३. कुंभ रास (Aquarius): कुंभ राशीतच ही युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि व्यापारात अनपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: सहावा बळी! "आता आश्वासनं नको, न्यायालयीन चौकशी हवी", बिट्स पिलानीतील मृत्यूच्या सत्रावरून पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल

Goa Accident: वळणावर दुचाकी घसरली अन् दोन्ही पाय तुटले, झुआरी पुलावर भयंकर अपघात! 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IND VS PAK: मैदानावर हाय-व्होल्टेज ड्रामा! वैभव सूर्यवंशी पाकिस्तानच्या फलंदाजावर भडकला; उपकर्णधाराला करावा लागला हस्तक्षेप VIDEO

कोकण किनारपट्टीवर 'मत्स्य दुष्काळ', थंडीमुळे मासेमारीला फटका; बोटी मासळीविनाच किनाऱ्यावर, मच्छीमार हवालदिल

Gold Silver Price: सुवर्णवार्ता… सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! बजेटनंतर भाव उतरल्याने ग्राहकांची चांदी, जाणून घ्या आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT