Shukra Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Shukra Gochar 2026: शुक्राचे मिथुन राशीत आगमन: 14 मे पासून 'या' 4 राशींचे नशीब फळफळणार; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार मोठे यश!

14 May Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात ऐश्वर्य, संपत्ती आणि सुखाचा कारक मानला जाणारा 'शुक्र' ग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे.

Sameer Amunekar

ज्योतिषशास्त्रात ऐश्वर्य, संपत्ती आणि सुखाचा कारक मानला जाणारा 'शुक्र' ग्रह आपले राशी परिवर्तन करत आहे. १४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी शुक्र देव आपल्या मित्र राशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. बुध आणि शुक्र यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या गोचराचा प्रभाव अत्यंत शुभ ठरणार आहे. विशेषतः चार राशींच्या लोकांसाठी हा काळ 'जॅकपॉट' लागण्यासारखा असेल, ज्यामध्ये आर्थिक वृद्धीसोबतच करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल.

वृषभ रास: आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नात वाढ

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे राशी परिवर्तन वरदान ठरेल. तुमच्या सुख-समृद्धीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली आर्थिक कामे आता मार्गी लागतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन पर बक्षीस किंवा पगारवाढ मिळण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ गुंतवणुकीतून चांगला परतावा देणारा ठरेल आणि तुमची बँक शिल्लक वाढण्यास मदत होईल.

मिथुन रास: स्वप्नपूर्ती आणि आकर्षणाचे केंद्र

शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसेल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. ज्यांना परदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतीलच, शिवाय वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदीचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि जीवनात प्रेमाचा ओलावा वाढेल.

कन्या रास: नशिबाची साथ आणि नवी संधी

कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर करिअरमध्ये प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारे ठरेल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश संपादन कराल. नोकरीमध्ये पदोन्नतीची बातमी ऐकायला मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले तणाव दूर होतील. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील.

तूळ रास: मान-सन्मान आणि सुखाची उधळण

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ भौतिक सुखात वाढ करणारा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. रखडलेली कामे अचानक पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. एकंदरीत, हा काळ तुमच्यासाठी ऐश्वर्य घेऊन येणारा ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

Goa Eco-Friendly Ganesha: मूर्तीकारांसाठी सावंत सरकारची मोठी घोषणा! आता प्रत्येक मातीच्या मूर्तीवर मिळणार 'इतके' अनुदान; पर्यावरण संरक्षणाचा नवा पॅटर्न

Goa Shack Policy 2026: गोव्यात सुधारित 'शॅक धोरण' लागू! समुद्रकिनाऱ्यावर डेक-बेड्स, छत्र्या ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT