Shani Gochar Dainik Gomantak
Horoscope

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Shani Gochar 2027: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांचे परिवर्तन खूप महत्त्वाचे मानले जाते. या बदलांचा थेट परिणाम मनुष्य जीवनातील अनेक पैलूंवर होत असतो.

Manish Jadhav

Shani Gochar 2027: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांचे परिवर्तन खूप महत्त्वाचे मानले जाते. या बदलांचा थेट परिणाम मनुष्य जीवनातील अनेक पैलूंवर होत असतो. विशेषतः शनि ग्रहाचे राशी परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्याचा प्रभाव आरोग्य, धन, संबंध, कुटुंब आणि करिअरवर पडतो. पुढील वर्षी 2026 मध्ये शनि ग्रहाच्या चालीत बदल होईल, परंतु तो राशी बदलणार नाही. मात्र, 2027 मध्ये शनि ग्रह आपले राशी परिवर्तन करेल.

शनि गोचर 2027 (Shani Gochar 2027)

शनि ग्रह सुमारे अडीच वर्षांनी राशी बदलतो. 2027 मध्ये होणारे शनिचे गोचर पुढीलप्रमाणे असेल. 2027 मध्ये शनि ग्रह सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. यानंतर शनि ग्रह 19 ऑक्टोबर 2027 पर्यंत मेष राशीत राहील. शनि वक्री झाल्यामुळे तो पुन्हा राशी बदलून मीन राशीत प्रवेश करेल. 2027 मध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या राशी परिवर्तनामुळे खालील 5 राशीच्या लोकांना विशेषतः सावधानता बाळगण्याची गरज असेल.

1. कर्क (Cancer)

कर्क राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे आणि कर्क राशीच्या जातकांसाठी शनिची दृष्टी काहीशी जड ठरु शकते. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच, नातेसंबंधात तणाव वाढू शकतो. आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी विशेषतः सावध राहण्याची गरज आहे.

2. कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी 2027 मध्ये काही समस्या वाढू शकतात. या लोकांना कायदेशीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, नातेसंबंधात तणाव (Stress) वाढू शकतो आणि जुनी अपूर्ण कामे अडचणी निर्माण करु शकतात. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

3. तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांचे नातेसंबंध या काळात अधिक प्रभावित होऊ शकतात. वादविवादांपासून दूर राहावे लागेल आणि नातेसंबंधात प्रामाणिकपणा ठेवणे महत्त्वाचे ठरेल. शनिच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

4. धनू (Sagittarius)

धनू राशीच्या लोकांसाठी काम आणि कुटुंब (Family) यांच्यात संतुलन राखणे 2027 मध्ये थोडे कठीण जाईल. शनिच्या राशी परिवर्तनामुळे या लोकांना आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

5. मीन (Pisces)

मीन राशीतून शनि ग्रह मेष राशीत प्रवेश करणार असल्यामुळे मीन राशीच्या जीवनात मोठे बदल घडू शकतात. शनिच्या गोचरमुळे घर, नोकरी किंवा शहरात बदल होण्याची शक्यता आहे. इतर राशींसाठी हे वर्ष शिकवणारे राहील आणि शनिच्या प्रभावामुळे प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ मिळेल. मात्र, या 5 राशींना विशेषतः सावध राहण्याची गरज असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT