what is karmic debt number Dainik Gomantak
Horoscope

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

karmic debt in numerology: अंकशास्त्रानुसार, यामागचे उत्तर आपल्या जन्मतारखेत दडलेले असू शकते. काही लोक मागील जन्मातील अधुरी कर्मे किंवा ऋण सोबत घेऊन येतात

Akshata Chhatre

karmic impact in numerology: अनेकदा आपण आपल्या नशिबाला दोष देतो, ‘आयुष्य इतकं कठीण का आहे?’ असा प्रश्न विचारतो. पण अंकशास्त्रानुसार, यामागचे उत्तर आपल्या जन्मतारखेत दडलेले असू शकते. काही लोक मागील जन्मातील अधुरी कर्मे किंवा ऋण सोबत घेऊन येतात, ज्याचा परिणाम म्हणून त्यांना या जन्मात अधिक संघर्ष करावा लागतो. ही कर्मे म्हणजे केवळ चुकीच्या कृत्यांचे परिणाम नाहीत, तर नात्यांमधील बेपर्वाई, जबाबदाऱ्यांपासून पळ काढणे किंवा अर्धवट सोडलेली कर्तव्ये यांचा भार असतो.

हिंदू धर्मातील ‘कर्मसिद्धांत’ आणि अंकशास्त्र यांच्यात एक गूढ संबंध आहे. आपल्या जन्मतारखेतील मूलांक, म्हणजेच जन्मतारखेतील संख्यांची बेरीज, यावरून हे ऋण समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांना आयुष्यात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अशा तारखांमध्ये प्रामुख्याने १, २, ४, ७, १३, १४, १६, १९ आणि २५ यांचा समावेश होतो.

मूलांकानुसार कर्म-प्रभाव

मूलांक १: ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचे आयुष्य सूर्याप्रमाणे तेजस्वी असते. पण गतजन्मातील अहंकारामुळे किंवा इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना अनेकदा एकाकीपणाचा सामना करावा लागतो. त्यांना यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते यश थोडे उशिराने मिळते.

मूलांक २: मूलांक २ असलेल्या व्यक्ती (जन्म २, ११, २०, २९) स्वभावाने अत्यंत हळव्या आणि भावनाप्रधान असतात. त्यांच्या याच स्वभावामुळे निर्णय घेताना त्यांना अनेकदा अडचणी येतात. भावनिक अस्थिरतेमुळे त्यांच्या कामात सतत अडथळे येतात आणि यश त्यांना लवकर मिळत नाही. पण एकदा का त्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवले, की ते यशाच्या शिखरावर पोहोचतात.

मूलांक ४ आणि ७: मूलांक ४ (जन्म ४, १३, २२, ३१) आणि मूलांक ७ (जन्म ७, १६, २५) असलेल्या लोकांनाही कर्मदोषाचा सामना करावा लागतो. मूलांक ४ असलेल्या लोकांच्या आयुष्यात अनेकदा संघर्ष आणि बंडखोरी असते. १३ या तारखेला जन्माला आलेल्या लोकांना 'कर्मभोगाचा' सामना करावा लागतो असे मानले जाते. त्याचप्रमाणे, मूलांक ७ असलेल्यांना अनेकदा मानसिक अशांतता आणि अपरिचित आघातांना सामोरे जावे लागते. १६ तारखेला जन्मलेल्यांसाठी हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण गतजन्मातील काही दैवी जबाबदाऱ्यांची पूर्तता न केल्याचा हा परिणाम मानला जातो.

मूलांक ५: मूलांक ५ असलेल्या व्यक्ती (जन्म १४, २३) अत्यंत बुद्धिमान आणि झपाट्याने निर्णय घेणाऱ्या असतात. पण गतजन्मातील जबाबदाऱ्यांपासून पलायन केल्यामुळे या जन्मात ते जीवनाच्या सर्व अंगांनी बांधले जातात. त्यांच्या यशामागे संयम आणि सातत्याची गरज असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT