Mangal Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

Mars Transit In Rohini Nakshatra: नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा पराक्रमी 'मंगळ' ग्रह रविवारी (5 जुलै) दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

Manish Jadhav

Mars Transit In Rohini Nakshatra: नवग्रहांचा सेनापती मानला जाणारा पराक्रमी 'मंगळ' ग्रह रविवारी (5 जुलै) दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चंद्राचे स्वामित्व असलेल्या या नक्षत्रात मंगळाचे हे गोचर एकूण चार राशींसाठी अत्यंत फलदायी आणि भाग्यवान ठरणार आहे. मंगळ देव येत्या 24 जुलैपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहतील आणि त्यानंतर ते मृगशिरा नक्षत्रात मार्गस्थ होतील. मंगळाच्या या नक्षत्र बदलामुळे मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

या काळात संबंधित राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळण्यासोबतच त्यांच्या साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासात मोठी वाढ झालेली दिसेल.

मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचे हे गोचर करिअरला एक नवी दिशा देणारे ठरेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही लीलया पार पाडाल. बऱ्याच काळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे या काळात वेगाने पूर्ण होतील.

कर्क राशीच्या जातकांसाठीही हा काळ भाग्योदयाचा असेल. नोकरीत यश मिळण्यासोबतच तुम्हाला कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून चाललेला मानसिक ताणतणाव आणि वाद संपुष्टात येऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योग देखील येत आहेत.

सिंह राशीच्या व्यक्तींवर मंगळ देवाच्या शुभ प्रभावामुळे यशाचा वर्षाव होईल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल, ज्यामध्ये पदोन्नती (Promotion) किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाला या काळात नवीन ग्राहक मिळून व्यवसायात मोठा नफा कमावता येईल. दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गोचर आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल. जर तुम्ही या काळात कुठेही गुंतवणूक केली, तर त्यातून तुम्हाला भविष्यात मोठा परतावा आणि फायदा मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. आर्थिक चणचण दूर होऊन जुनी रखडलेली कामे मार्गी लागल्याने तुम्हाला मोठा मानसिक दिलासा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

...अन् सर्वजण आकाशाकडेच पाहत राहिले! क्रिकेट सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही; चाहत्यांनी पाहिला अद्भुत नजारा Watch Video

Ganesh Idol Sellers Registration: गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणीसाठी मुदतवाढ, पर्यावरण विभागाकडून संकेतस्थळ सुरू ठेवण्याचे निर्देश

Agniveer New Rules: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! वीरमरण आल्यास कुटुंबाला पेन्शन किंवा नोकरी देण्याची तयारी; लवकरच नियमात होणार बदल

Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

Delhi Red Fort Blast: दिल्ली बॉम्बस्फोटामागे 'अल-कायदा'! UNच्या अहवालातून मोठा खुलासा; 'जैश'चे नाव पुढे करुन खेळला खतरनाक खेळ

SCROLL FOR NEXT